शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

गुजरातसाठी महाराष्ट्राच्या वाढवण बंदराचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 05:27 IST

जेएनपीटीतील १० हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराचे काम बंद करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. या बंदरामुळे गुजरात राज्यातील बंदरे धोक्यात येण्याची शक्यता आहे.

- मधूकर ठाकूरउरण - जेएनपीटीतील १० हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराचे काम बंद करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. या बंदरामुळे गुजरात राज्यातील बंदरे धोक्यात येण्याची शक्यता आहे.जेएनपीटीने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर (वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लि.) उभारण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिक १८ मीटर खोली असलेल्या बंदरात मदर वेसल्स म्हणजेच सर्वात मोठी मालवाहू जहाजे लागण्याची सोय होणार आहे. तसेच आवश्यक पायाभूत सुविधांसह रेल्वे वाहतूक, दळणवळण आणि आयात निर्यातीसाठी सर्वच सोयीनी उपयुक्त असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदरासह १० हजार कोटी खर्च होणार आहेत.यासाठी जेएनपीटीने गेल्या तीन वर्षात कोटी खर्च केले आहेत. वाढवण बंदराच्या जवळपासच्या गुजरातमध्ये मुंद्रा, पीपाव आदि बंदरे उद्योजक आदानी यांच्या मालकीची आहेत. आदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. अदानींच्या बंदराप्रमाणेच गुजरातमध्ये आणखीही बंदरे आहेत. त्या बंदराच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकेल, असे वाटल्याने हे बंदर बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोप येथील कामगार वर्गाकडून केला जात आहे.तोट्यातील दिघी बंदरासाठी जेएनपीटी- वाढवण बंदरावर पंतप्रधान कार्यालयाकडूनच बंदीचे अरिष्ट आले असतानाच जेएनपीटीने बालाजी इन्फ्रा प्रा. लि. अर्थात दिघी बंदर चालविण्यासाठी ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. मेरिटाईम बोर्डाशी २००२ साली करार करून २०१२ पासून सुरू करण्यात आलेल्या बंदरावर ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २०१६ पर्यंत या बंदराचा तोटा ५९१ कोटी पर्यंत पोहोचला आह.- दिघी पोर्टवर बँकाची १८०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. हे कर्ज फेडण्याची तयारी जेएनपीटीने चालवली आहे. १८०० कोटीच्या कर्जाच्या परतफेडीबरोबरच रेल्वे कनेक्टीव्हीटीसाठी ८०० कोटी खर्च जेएनपीटी करणार आहे. त्यासाठी १५ जानेवारी २०१८ रोजीच्या बोर्ड आॅफ ट्रस्टीच्या मिटिंगमध्ये ट्रान्झक्शन आणि फायनान्सची चाचपणी करण्यासाठी एसबीआय कॅप कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्तीही करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे.वाढवण बंदरात सध्या डीपीआरची कामे सुरू आहेत. मात्र वाढवण बंदर उभारणीस विलंब होत असला तरी तो बंद करण्याच्या लेखी सूचना अद्याप जेएनपीटीकडे प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच दिघी पोर्टबाबत चाचपणी सुरू आहे. बंदराच्या अभ्यासासाठी एजन्सीही नियुक्त करण्यात आली आहे . - निरज बन्सल, प्रभारी अध्यक्ष, जेएनपीटी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात