शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

अंधत्व निवारणात महाराष्ट्राची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:10 IST

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रदान प्रोत्साहन व संकलनाचे कार्य केले जाते. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी समाजात नेत्रदानाविषयी केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात २०१७ ते २०१८ या एका वर्षांत ७ हजार ५६० नेत्रसंकलनाचा उच्चांक झाला आहे.

- पराग कुंकुलोळ चिंचवड - राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रदान प्रोत्साहन व संकलनाचे कार्य केले जाते. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी समाजात नेत्रदानाविषयी केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात २०१७ ते २०१८ या एका वर्षांत ७ हजार ५६० नेत्रसंकलनाचा उच्चांक झाला आहे.नेत्रदानाबाबत समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. शासकीय यंत्रणेबरोबच काही सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते नेत्रदान जनजागृती अभियान राबवित आहेत. तरीही राज्यातील मृत्यूचे प्रमाण व या पश्च्यात होणारे नेत्रसंकलन यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत कमी करून मृत्यूनंतर नेत्रदान प्रक्रिया सुलभ असून, त्याविषयी समाजात जनजागृती व प्रबोधनाची आवश्यकता आहे.रामचंद्र भालचंद्र यांचा विसर.... शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात १० जून १९२४ रोजी झाला. खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ऐंशी हजारांहून अधिक नेत्रचिकित्सा पूर्ण केल्या. अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत १९७९ मध्ये १० जून रोजीच मावळली. त्या दिवसाचे औचित्य म्हणून १९८२ पासून १० जून हा ‘दृष्टिदान’ दिवस म्हणून साजरा होतो. मात्र, हा दिवस दृष्टिदान दिन साजरा करताना अवघा महाराष्ट्राला डॉ. भालचंद्र यांचा विसर पडला आहे.आॅनलाइन पद्धतीचा उपयोग सध्या राज्यातील बहुतांशी नेत्रपेढीचे कार्य आॅनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. नेत्रदान प्रक्रियेनंतर मिळणारे बुबुळ योग्य रुग्णाला उपयोगी यावे, यासाठी ही प्रक्रिया उत्तम ठरत आहे. राज्यात अंधत्व नियंत्रण अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. आधुनिक पद्धतीचा वापर करत दृष्टिहीन व्यक्तींना योग्य उपचार मिळण्यासाठी तत्परता वाढली आहे. विविध घटनेतून दृष्टी गमावलेल्या रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळावेत यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याविषयी समाजात काही प्रमाणात जनजागृती वाढल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळू लागले आहेत.दृष्टिदान दिवसाची नाही जागतिक स्तरावर नोंद1स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा शहरात असणाºया जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदी व या विषयातील तज्ज्ञांशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता १० जून या दिवसाची जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून कोठेही नोंद नसल्याचे समोर आले आहे.2उलट मराठवाड्यातील डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचा विसर महाराष्ट्राला पडला ही शोकांतिका आहे. त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस आहे. त्यांचे नेत्रदानाबाबत असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दिवशी जनजागृती अभियान राबविली जाते, ही खरी पार्श्वभूमी असल्याचे नेत्रदान विषयातील तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Organ donationअवयव दानMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य