शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती-अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:34 IST

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून, विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही.

मुंबई : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून, विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.टिळक भवन या दादर येथील काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर अशोक चव्हाण बोलत होते. तत्पूर्वी चव्हाण यांनी हुतात्मा चौकात जाऊन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, चव्हाण यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. भाजपा सत्तेत आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग व्यापार मोठ्या संकटात सापडला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहे. केंद्रातले आणि राज्यातले सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करण्याऐवजी, दोन-चार उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करीत आहेत. कामगार कायदे बदलून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. देशाला भांडवलदारांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविण्यासाठी भाजपाला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशोक चव्हाण बुधवारी, २ मे रोजी नाणारला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. अशोक चव्हाण उद्या सकाळी ११.३० वाजता कात्रादेवी सागवे ता.राजापूर येथे स्थानिकांशी संवाद साधणार आहेत व त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या वेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी त्यांसोबत असतील.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा