शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील बोगस डॉक्टर लोकायुक्तांच्या रडारवर; कारवाईची माहिती सादर करा, अधिकाऱ्यांना आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 12:41 IST

या आदेशाची प्रत सर्व जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय अधिकारी, सर्व महापालिका आयुक्त यांना द्यावी. या सर्वांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांची माहिती पुढील सुनावणीला सादर करावी, असेही लोकायुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. यावरील पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

अमर मोहिते -मुंबई : महाराष्ट्रातील बोगस डॉक्टरांवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती सादर करण्याचे आदेश लोकायुक्त न्या. व्ही. एम. कानडे यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व पोलीस यांना दिले आहेत.या आदेशाची प्रत सर्व जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय अधिकारी, सर्व महापालिका आयुक्त यांना द्यावी. या सर्वांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांची माहिती पुढील सुनावणीला सादर करावी, असेही लोकायुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. यावरील पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मेडिकल कौन्सिल ऑफ ॲलोपॅथी यांच्याकडे अधिकृत नोंदणी नसलेले बोगस डॉक्टर हे समाजासाठी धोकादायक आहेत. झोपडपट्टी भागातच बोगस डॉक्टर अधिक असतात. अशा ठिकाणी बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचा मृत्यू होत असेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच बोगस डॉक्टरांची चौकशी होणे आवश्यक आहे, असेही लोकायुक्त न्या. कानडे यांनी आदेशात नमूद केले आहे.मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मेडिकल कौन्सिल ऑफ ॲलोपॅथी यांच्याकडे नोंदणी नसलेले अनेक बोगस डॉक्टर आहेत. अशा बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांची नाेंदणी रद्द करायला हवी, अशी मागणी करणारा अर्ज अमित मिश्रा यांनी लोकायुक्तांसमोर केला होता. हे प्रकरण जनहितार्थ असल्याने लोकायुक्त न्या. कानडे यांनी ते सुओमोटो दाखल करून घेतले व वरील आदेश देत ही सुनावणी तहकूब केली.

होमिओपॅथीचे १३६ बोगस डॉक्टर -मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यांनी बोगस डॉक्टरांवर केलेल्या कारवाईची माहिती लोकायुक्त यांच्याकडे सादर केली. त्यानुसार १३६ बोगस डॉक्टरांचे नाव नोंदणी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. ही कारवाई अशी सुरू ठेवा, असेही लोकायुक्त यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यांना सांगितले आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र