शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलसाठी नाशिक जिल्ह्यात ७०़२८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:02 IST

नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये बुधवारी (दि़२८) मतदानपक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली़ जिल्ह्यातील एकूण ४६१० वकील मतदारांपैकी ३२५० वकीलांनी अर्थात ७०़२८ टक्के वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़

ठळक मुद्दे जिल्ह्यात ४६१० वकीलांपैकी ३२४० मतदान जिल्ह्यात एकूण १४ मतदान केंद्र

नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये बुधवारी (दि़२८) मतदानपक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली़ जिल्ह्यातील एकूण ४६१० वकील मतदारांपैकी ३२५० वकीलांनी अर्थात ७०़२८ टक्के वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात मतदानासाठी वकीलांनी लावलेल्या रांगा व केवळ दोन मतदान केंद्र यामुळे ओरड झाल्यानंतर दुपारी चार मतदान केंद्र वाढविण्यात आले़ मतदानासाठीसुमारे अडीच तासांची प्रतिक्षा करावी लागत असल्याने प्रारंभी गोंधळ निर्माण झाला होता़ दरम्यान, निवडणुकीत उभ्या असलेल्या काही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही यावेळी घडले़

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुकच्या मतदानासाठी जिल्हा सत्र न्यायालयासह तालुका न्यायालयांमध्ये १४ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते़ या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६४ उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे़ जिल्हा व सत्र न्यायालयात मतदानासाठी सकाळी नऊ वाजेपासून वकील रांगेत उभे होते़ मात्र, ३०९२ मतदारांसाठी आयटी लायब्ररी व सहायक सरकारी वकीलांचे कार्यालय असे दोनच मतदान केंद्र असल्याने सुमारे अडीच तास एका मतदानासाठी लागत होते़ याबाबत उमेदवार व वकीलांनी ओरड केल्यानंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मतदान केंद्रांची संख्या चारने वाढविण्यात आली़

जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळपासूनच निवडणुकीतील उमेदवार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अ‍ॅड़ जयंत जायभावे, माजी सदस्य अ‍ॅड़ अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप वनारसे, आॅल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रायणी पटणी, नाशिक बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड़ बाळासाहेब आडके, अ‍ॅड़ विवेकानंद जगदाळे, अ‍ॅड़ लीलाधर जाधव, अ‍ॅड़ अनिल शालिग्राम हे वकील मतदारांना आपल्याला मतदान करावे यासाठी विनंती करीत होते़ तर मतदारांची नावे व सिरीयल नंबर शोधण्यासाठी जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीत उमेदवारांचे समर्थक मदत करीत होते़

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यातील एक लाख दहा हजार वकील मतदारांसाठी ३११ न्यायालयांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली़ या निवडणुकीतून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे २५ सदस्य निवडले जाणार असून त्यामधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे़ या निवडणुकीच्या प्रचारासाठी अखेरपर्यंत उमेदवारांकउून प्रत्यक्ष गाठीभेटींबरोबरच सोशल मीडियाचा (व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक) प्रचारासाठी प्रभावीपणे वापर करण्यात आला़ पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेसाठी संपूर्ण जिल्हाभरात केंद्राध्यक्ष्न, मतदान अधिकारी व मदतनीस अशा ९० जणांची नेमणूक करण्यात आली होती़

सुमारे दोन महिन्यांनंतर निकालमहाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांत बुधवारी पार पडलेल्या मतदानप्रक्रियेनंतर या सर्व ठिकाणच्या मतपेट्या मुंबई येथील महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या मीटिंग हॉलमध्ये नेण्यात येणार आहेत़ या निवडणुकीची पद्धती ही पसंतीक्रम असल्याने पसंतीनंतर उमेदवारांची मते मोजली जातील़ ही सर्व प्रक्रिया किचकट असल्याने सुमारे दोन महिन्यांनंतर या निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे़ 

नाशिक जिल्ह्यात केंद्रनिहाय मतदान (एकूण मतदान / झालेले मतदान)* नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय : ३०९२ / २०६९* चांदवड न्यायालय : ६९ / ६०* दिंडोरी न्यायालय :  ६१ / ४८* इगतपुरी न्यायालय : ८४ / ६३* कळवण न्यायालय : ४७ / ४२* मालेगाव न्यायालय : ४२७ / ३००* मनमाड न्यायालय : ४७ / ४३* नांदगाव न्यायालय : ७९ / ६०* निफाड न्यायालय : २३० / १७८* सटाणा न्यायालय : ५९ /४७* सिन्नर न्यायालय : १४२ / १११* येवला न्यायालय : ११२ / ८९* नाशिकरोड न्यायालय : ११२ / ८६* पिंपळगाव (ब) न्यायालय : ४९ / ४४एकूण मतदान :- ४६१० / ३२४० 

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयElectionनिवडणूक