शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
2
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
3
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
4
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
5
"बच्चे बड़े हो जाते हैं, लेकिन…" IPL वर वसीम अक्रमची तिखट टिप्पणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
7
‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
8
प्रदूषणामुळे वाढतोय सायलेंट स्ट्रोकचा धोका? लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, निष्काळजीपणा ठरेल घातक
9
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
10
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
11
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
12
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
13
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
14
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
15
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
16
Nagpur: तुला नोकरी मिळवून देतो, आधी माझ्याशी...; विश्वास टाकून फसली अन् महिला कबड्डीपटूला आयुष्याला मुकली
17
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
18
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
20
डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:27 IST

Winter Session Maharashtra 2025: नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती फुटल्याचे दिसले असले तरी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाल्याचे म्हटले जात आहे.

Winter Session Maharashtra 2025: हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून रंगलेली चर्चा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वेगळ्याच वळणावर नेली. एक पक्ष दोन गटाच्या सरकारमध्ये एका गटाचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत. ते मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर नाचतात, असा दावा केला. त्याचा धसका गटाच्या नेत्याने घ्यायला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. यावरून विधिमंडळ परिसरात चांगलीच चर्चा रंगली. 

या चर्चेत शिंदेसेनेच्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनीही आपली स्पष्टोक्ती देत ते आमचेच आमदार असल्याचे सूतोवाच करीत आदित्य ठाकरेंच्या दाव्याला पूर्णविराम दिला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिंदेसेना खरी शिवसेना आहे. तो आमचा मित्रपक्ष आहे. त्यांचे आमदार घेऊन आम्ही काय करणार, ते आमचेच आमदार आहेत, असे राजकारण आम्ही करीत नाही. उलट शिंदेसेना मजबूत व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तत्पूर्वी अलीकडेच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत बरेच मानापमानाचे प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढले. परंतु, अधिवेशनात पुन्हा हम साथ साथ हैं, अशी भूमिका फडणवीस आणि शिंदे यांनी घेतल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

अधिवेशनात हम साथ साथ है...?

नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती फुटली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेने बहुतांश ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कमळावरच बाण ताणला. दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना हिम्मत देण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही. हे दोन्ही पक्ष एवढ्या तीव्रतेने निवडणूक लढले की काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी मैदानात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला. काही प्रसंग तर असे घडले की मतदानानंतर महायुती तुटेल की काय असे वाटायला लागले. हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटतील, असेही वाटत होते. पण, अधिवेशनात तर फडणवीस व शिंदे यांनी 'हम साथ साथ है'ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. दोघांमध्येही समन्वय दिसत आहे. हे चित्र पाहता निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी ठरवून कुस्ती आणि चित मात्र विरोधकांना केले, असेच अनेकांना वाटू लागले आहे, असे म्हटले जात आहे. 

दरम्यान, शिंदेसेनेचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत, अशी माहिती विधिमंडळ परिसरात आदित्य ठाकरेंनी दिली. मुळात त्यांना माहिती देणारे सूत्रच चुकीचे आहे. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद, मनभेद नाहीत. आमच्या आमदारांवर आमचा विश्वास असून, ते कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधिमंडळ परिसरात दिली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis-Shinde 'Hum Saath Saath Hai' in Winter Session; Opposition Checkmated!

Web Summary : During the winter session, Fadnavis and Shinde displayed unity, dismissing rumors of discord. Despite local election differences, both leaders presented a united front, surprising the opposition. Aditya Thackeray's claims of internal strife were refuted, highlighting the MahaYuti's strength and coordination.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती