शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra winter session 2021 : अध्यक्षांविना संपले अधिवेशन, निवडणूक झालीच नाही; राज्यपालांशी टळला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 06:45 IST

Maharashtra winter session 2021 : सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या सोमवारच्या बैठकीतही अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच, असा सूर होता. मात्र, मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आणि सरकारने निवडणुकीवर यू-टर्न घेतल्याचे म्हटले जाते. 

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावर ठाम असलेल्या  आघाडी सरकारने राज्यपालांशी अधिक संघर्ष टाळला आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही निवडणूक घेतली नाही. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे दिसले. काँग्रेसला याही अधिवेशनात अध्यक्षपदाने हुलकावणी दिली.

‘विधानमंडळ हे कायदेमंडळ आहे आणि त्यात झालेले निर्णय आपल्या कक्षेत येत नाहीत’, असे बजावून सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी अनुमती दिली नाही तरी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे स्पष्ट संकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविलेल्या पत्रात सोमवारी दिले होते. 

सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या सोमवारच्या बैठकीतही अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच, असा सूर होता. मात्र, मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आणि सरकारने निवडणुकीवर यू-टर्न घेतल्याचे म्हटले जाते. 

पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चासूत्रांनी सांगितले की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्याआधी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी पवार आणि ठाकरे या दोघांनाही राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्यातील धोक्यांबाबत ‘ब्रीफ’ केले होते.  निवडणूक झालीच तर ती घटनाबाह्य घेतल्याचे कारण देत राज्यपाल, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अडचणीत आणले जाईल आणि भाजपच्या खेळीला राज्य सरकार बळी पडल्यासारखे होईल, तेव्हा निवडणूक टाळावी, असे पवार-ठाकरे चर्चेत ठरल्याचे समजते. त्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशीही चर्चा करण्यात आली आणि निवडणूक न घेण्याचे निश्चित करण्यात आले.

राष्ट्रपती राजवटीला आमंत्रण? ‘अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेणे हे घटनात्मक नाही, असे राज्यपालांचे म्हणणे हाेते.  तरीही ती तुम्ही घेणार असाल तर राष्ट्रपती राजवटीला ते आमंत्रण ठरेल, असे राज्यपालांच्या पत्रात थेट नमूद नसले तरी त्यादृष्टीने त्यांनी अंगुलीनिर्देश केला होता, अशी माहिती आहे.  त्यामुळेच सरकार बॅकफूटवर गेल्याचे म्हटले जाते. अध्यक्षपदासाठी सरकार पणाला न लावण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली. भविष्यात आवाजी मतदानानेच ही निवडणूक घ्यायची यावर मात्र सरकार ठाम आहे.

काँग्रेसच्या पदरी निराशाच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून (फेब्रुवारी २०२१) अध्यक्षपद रिक्त आहे. अध्यक्षांच्या निवडीशिवाय मंगळवारी हिवाळी अधिवेशनदेखील संपले. आता फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या अधिवेशनापर्यंत वाट बघावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडे १७० आमदारांचे संख्याबळ असतानाही काँग्रेसला अध्यक्षपद मिळू शकले नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरातविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारी २०२२ पासून नागपुरात होणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Parishadविधान परिषद