शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra winter session 2021 : कंत्राटदार बदलले, गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करणार, एकनाथ शिंदेचे विधानसभेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 06:07 IST

Maharashtra winter session 2021 : तारांकित प्रश्नावरील चर्चेत शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले.  इंदापूर ते रत्नागिरीच्या हद्दीपर्यंतचा रस्ता अतिशय खराब आहे. हा महामार्ग कधी तरी पूर्ण होईल का आणि कधी होणार, असा प्रश्न त्यांनी केला.

मुंबई : मुंंबई-गोवा महामार्गाचे काम बारा वर्षांपासून रखडले असताना आतापर्यंत हे काम करणाऱ्या दोन्ही कंपन्यांना बदलण्यात आले असून नवीन कंत्राटदार कंपन्यांमार्फत हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. 

तारांकित प्रश्नावरील चर्चेत शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले.  इंदापूर ते रत्नागिरीच्या हद्दीपर्यंतचा रस्ता अतिशय खराब आहे. हा महामार्ग कधी तरी पूर्ण होईल का आणि कधी होणार, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर शिंदे यांनी सांगितले की,  मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला दोन कंत्राटदारांमुळे विलंब झाला. या कंत्राटदारांना बँकेचे कर्ज देण्यापर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मदत केली. आताही गरज पडल्यास आपण  गडकरी यांच्याशी चर्चा करू. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी रस्ते चांगले आहेत; पण पनवेल ते इंदापूरपर्यंतचे काम खराब आहे.  आता नवीन कंत्राटदार नियुक्त केला आहे.  

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भात प्रशांत ठाकूर,  संजय पोतनीस, भास्कर जाधव, सुनील राऊत, अजय चौधरी व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी लेखी उत्तर दिले. त्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल-इंदापूर या ८४ किमी लांबीच्या चौपरीकरणाचे काम केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या रस्त्याचे काम बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर हाती घेण्यात आलेले काम संथगतीने सुरू आहे, अशी माहिती लेखी उत्तरात दिली आहे. 

मुंबई-गोवा महामार्ग हा जिव्हाळ्याचा व संवेदनशील प्रश्न आहे. हा महामार्ग खराब असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या वाहनांना आपण टोलमाफीही देतो.- एकनाथ शिंदे, सार्वजनिक उपक्रममंत्री  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभा