शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र होरपळणार! पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 05:52 IST

सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह लगतच्या भागात कमाल तापमानात कमालीची वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढतच असून, याता आता आणखी भर पडणार आहे. कारण, हवामानात होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्र, तेलंगणाच्या बहुतांश भागात, गुजरात, छत्तीसगड, रायलसीमा अनेक भागांवर, ओडिशाअंतर्गत काही भागांसह तामिळनाडू, केरळ येथे कमाल तापमानाची नोंद ३५ ते ३७ सेल्सिअसच्या आसपास होत असून, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात दाेन ते तीन अंशाची भर पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र उन्हाने होरपळून निघणार आहे.

सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह लगतच्या भागात कमाल तापमानात कमालीची वाढ होत आहे. थंडीने तर राज्यातून केव्हाच माघार घेतली असली तरी राज्यातील काही ठिकाणी रात्री गारवा आणि दिवसा उन्हाचा तडाखा, असे वातावरण आहे. मुंबईचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून इथल्या प्रदूषणाने कहर केला असतानाच दुपारी बारा ते दाेनदरम्यान पडणारे ऊन अक्षरश: चटके देत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत असून, हवामानातील बदलामुळे मुंबईकर व्हायरल फिव्हरने हैराण झाले आहेत. गुजरातकडून येणारे वारे, पूर्वेकडून वाहणारे वारे समुद्राहून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अटकाव करत आहेत. त्यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानाची नोंद आता ३५ अंशाच्या आसपास होत असली तरी होळीनंतर यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र