शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अखेर गारपीट झालीच; पळविला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 06:23 IST

कांदा, द्राक्षे, भाजीपाला पिकासह खरिपातील ज्वारी, मका पिकांचे नुकसान 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह नाशिकला सोमवारी संध्याकाळनंतर झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्यात कांदा, द्राक्षे, भाजीपाला पिकासह खरिपातील ज्वारी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी बागलाणसह येवला, मनमाड, पेठ येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, आंबा, मिरची, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील साल्हेर, अंतापूर, जायखेडासह काही भागात गारपीट झाली. दिंडोरी तालुक्यात ओझे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे समाधान पठाडे यांची अडीच एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली. निफाड तालुक्यातील विंचूर येथे  रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान बेमोसमी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत. पावसाने द्राक्षबागांसह काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. 

नंदुरबार : शहादा तालुक्यात अवकाळी शहादा तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी संध्याकाळनंतर वाऱ्यासह गारपीट झाली. पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्याचबरोबर पपईची तोड थांबू शकते. 

धुळे : खरीप पिके आडवीसोमवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. साक्री तालुक्यातील वसमार, म्हसदी आणि धुळे तालुक्यातील शिरधाने प्र. नेर, न्याहळोद परिसरातील कांदा आणि मका पिकांना फटका बसला. शिरधाने प्र. नेर येथे अवकाळी पावसासह गारपीट झाली. 

जळगाव : ५ मिमी पाऊसजिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी ढगाळ वातावरण कायम होते. सुदैवाने पावसाने फारसे नुकसान झालेले नाही. ढगाळ वातावरण कायम राहिले तर ज्वारी व मका पिकांना काही प्रमाणात फटका बसू शकतो.  

टॅग्स :Farmerशेतकरी