शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

महाराष्ट्र तापला !

By admin | Updated: March 3, 2017 06:14 IST

होळीनंतर खऱ्या अर्थाने तापणारा महाराष्ट्र आतापासून धुमसायला लागला आहे.

पुणे : होळीनंतर खऱ्या अर्थाने तापणारा महाराष्ट्र आतापासून धुमसायला लागला आहे. आताच अशी गत तर पुढे कसे होणार... अशी धास्ती सर्वांनाच लागून राहिली आहे. त्यातच जागतिक तापमानवाढीमुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह देशभरातील १७ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविल्याने एकूणच यंदाचा उन्हाळा तापदायक होणार असल्याची चिन्हे आहेत. विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतील कमाल तापमानात गुरुवारी मोठी वाढ नोंदविण्यात आली. कोकण किनारपट्टी भागातील भिरा हे राज्यातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरले आहे. येथील तापमान ४२.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. तर सर्वांत कमी तापमान नगरमध्ये १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मात्र, येथील कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांवर आहे. उर्वरित बहुतांश जिल्ह्यातील पारा ३५ अंशांच्या पुढेच असून, किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली आहे. भिरापाठोपाठ अकोला दुसरा उष्ण जिल्हा ठरला आहे. येथील कमाल तापमान ३८.६, तर किमान तापमान १९.७ अंश सेल्सिअस आहे. विदर्भातील चंद्रपूर व ब्रह्मपुरीचे कमाल तापमान ३८ व किमान तापमान अनुक्रमे १९ व २० अंश सेल्सिअस आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर आणि मालेगाव जिल्ह्यातील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या घरात गेले असून, किमान तापमान अनुक्रमे २० आणि १९च्या घरात आहे. (प्रतिनिधी)>मुंबईकरांना यंदा उन्हाचे चटकेमुंबईचे कमाल तापमानही ३६ ते ३८ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत असून, वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईकर चटक्यांमुळे हैराण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील सातएक दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. विशेषत: पूर्व आणि ईशान्य दिशेकडून वेगाने वाहणारे वारे आणि समुद्राहून वाहणारे वारे स्थिर होण्यास होणारा विलंब या दोन घटकांमुळे कमाल तापमानात वाढ होत असून, उत्तरोत्तर यात भरच पडेल, कुलाबा वेधशाळेने कळविले आहे.>जागतिक हवामान बदलामुळेच तापमानात वाढ होत आहे. यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा अधिक गरम असेल. - डॉ. ए. के. सहाय, प्रमुख, हवामान संशोधन विभाग, पुणे वेधशाळा >६ ते ८ मार्च पावसाची शक्यता गेल्या आठ- दहा दिवसांपासून वातावरणात आमूलाग्र बदल जाणवत आहे. येत्या ६ मार्च ते ८ मार्चच्या दरम्यान राज्यातील विदर्भ, मराठवाडा पूर्व भाग, सोलापूर, दक्षिण महाराष्ट्राच्या पूर्व भागातील सांगली, सातारा, तर पुण्याच्या पूर्व भागात हवामान बदल घडून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ