शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'त्या' फाईलमध्ये दडलंय काय? संजय राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 11:13 IST

Maharashtra Election Result 2019: राजकीय वर्तुळात 'त्या' फाईलची चर्चा

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस झाले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. मात्र सत्तापदांच्या वाटवावरुन शिवसेना, भाजपामध्ये दबावाचं राजकारण सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत एकमेकांवर दबाव वाढवला. काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या एका फाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.शिवसेना खासदार संजय राऊत सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. काल त्यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी घाईघाईत एक फाईल मागे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाकडे दिली. त्या फाईलमागे नेमकं काय आहे, याबद्दल अनेकदा विचारूनही राऊत यांनी उत्तर देणं टाळलं. त्या फाईलमध्ये महत्त्वाची कागदपत्रं असल्याचं सूचक विधान त्यांनी केलं. फाईलमधल्या कागदपत्रांबद्दल योग्य वेळी बोलू असंदेखील ते म्हणाले.संजय राऊत यांनी आज सकाळीदेखील पत्रकारांना संबोधित केलं. यावेळीही पत्रकारांनी त्यांना त्या फाईलबद्दल प्रश्न विचारले. त्यावर शिवसेनेकडे काय आहे ते सगळ्यांना माहितीय, असं उत्तर राऊत यांनी दिलं आहे. संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्याच आमदारांची यादी त्या फाईलमध्ये होती का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना