शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विधान भवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?; आमदार महेश शिंदेंनी मांडली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:22 IST

लोकशाहीचे संकेत विरोधकांनी पाळले नाही. सीसीटीव्ही फुटेज पाहावेत अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार ५० खोके एकदम ओक्के हा नारा देत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. परंतु आज सत्ताधारी पक्षाचे आमदारही राष्ट्रवादी-शिवसेनेविरोधात नारेबाजी करत होते. अधिवेशनापूर्वी शिंदे गटाचे आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत असताना विरोधकही तेथे उपस्थित झाले. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात राडा झाला. 

या गोंधळात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र इतर आमदारांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारावर आमदार महेश शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अतिशय चांगले काम करतंय. परंतु गेल्या ६ दिवसांपासून विरोधी पक्षाचे आमदार आंदोलन करताना वेगवेगळे आरोप करत होते. त्याला उत्तर देण्यासाठी आमचे प्रतोद भरत गोगावले यांच्या नेतृत्वात आमदारांची बैठक झाली. या बैठकीत विरोधकांच्या निषेधार्थ आंदोलन करायचं ठरलं असं त्यांनी सांगितले. 

तसेच सकाळपासून आम्ही शांततेत हे आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यांवर करत होतो. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आमच्या मागे उभे राहिले आणि अचानक काही आमदार आमच्या पुढे येऊन आंदोलन करू लागले. जे काही आहे ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालंय. विरोधक ज्यापद्धतीने वागले ते महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आम्ही आंदोलन करताना त्याठिकाणी येणे चुकीचं होतं असं आमदार महेश शिंदे यांनी म्हटलं. 

दरम्यान, लोकशाहीचे संकेत विरोधकांनी पाळले नाही. सीसीटीव्ही फुटेज पाहावेत आमचं आंदोलन कशारितीने दाबण्याचा प्रयत्न केला हे पाहिलं पाहिजे. याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही तक्रार केली आहे. अमोल मिटकरी चुकीच्या विचारांचे व्यक्तिमत्व आहेत हे महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यामुळे त्यांना फार किंमत देत नाही. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे जाण्यासाठी शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही बाहेर पडलो. गेले अडीच वर्ष मविआ सरकारचा भोंगळ कारभार सुरू होता. मागच्या सरकारमध्ये जे होते त्यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी लगावला. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनAmol Mitkariअमोल मिटकरीEknath Shindeएकनाथ शिंदे