शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या जागावाटपावर शरद पवारांचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 06:26 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

नाशिक : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून, दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आघाडीचे जागावाटप निश्चित झाले आहे. ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असून, त्या जागा कोणत्या, यावर दोन्ही पक्षाचे नेते उद्या मुंबईत चर्चा करणार आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते दहा विधानसभा मतदारसंघांत बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष घेतील. आघाडीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा सहभाग राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमच्या विरोधात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरे यांची भूमिका मान्य नसून, मित्रपक्षांनीदेखील मनसेला सोबत घेण्यात सकारात्मकता दर्शविलेली नाही, असेही पवार यांनी सांगितले.येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात येणार असून, राष्टÑवादी कॉँग्रेसने या निवडणुकीत नवीन चेहºयांना संधी देऊन तरुण पिढीचे नेतृत्व उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही पवार यांनी दिली.>ईडीच्या नोटिसांद्वारे राष्टÑवादी नेत्यांना धमकीईडीची नोटीस दाखवून माझ्या सहकाºयांना धमकावण्यात आले. मी नावे उघड करणार नाही. मात्र, आमच्यातून गेलेल्या काही जणांनी हे सांगितलं, असा दावा शरद पवार यांनी केला. उदयनराजेंच्या आरोपांवर काहीही बोलायचे नाही. त्यांना १५ वर्षांनंतर हे आरोप सुचले का? इतकाच माझा प्रश्न आहे, असा टोलाही पवारांनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019