शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांचे नाशिकमध्ये भर पावसात शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 04:42 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली.

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. भर पावसातही रोड शो आणि बाइक रॅलीच्या माध्यमातून फडणवीस यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. तर, मनसे व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर काळे फुगे सोडून यात्रेला विरोध नोंदविला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी नाशिक येथे पोहोचली आहे. सायंकाळी शहरातील पाथर्डी फाटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. सुमारे पाच हजार दुचाकीस्वार भाजपाचे झेंडे आणि ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले. सिडकोमार्गे मोटारसायकल रॅली गोल्फ क्लब येथे आल्यानंतर त्र्यंबक नाका येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू झाला. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सिडको परिसरातील विजयनगर चौकात युवतींचे लेझिम पथक आणि मºहाठमोळ्या पोषाखात सहभागी झालेल्या अश्वारूढ युवतींच्या पथकाने स्वागत केले, तर हनुमान मंदिर चौकात आदिवासी पथकाच्या चमूने पारंपरिक पद्धतीने फडणवीस यांचे स्वागत केले.शहरातून निघालेली ही मिरवणूक पंचवटी कारंजा येथे जात असतांनाच जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ झाली पण रोड शो सुरूच ठेवण्यात आला होता. मनसे व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर हवेत काळे फुगे सोडून यात्रेस विरोध दर्शविला.>तिघे जण ताब्यातमहाजनादेश यात्रा जीपीओ चौकात आली असता शिक्षणाच्या प्रश्नावर काही तरुणांनी मुख्यमंत्र्यांना फलक दाखविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेप्रसंगी काही संघटनांनी विरोध करण्याची भूमिका घेतल्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत शंभरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना नोटिसा बजविल्या होत्या, तर काहींना ताब्यातही घेण्यात आले होते. तरी काळे फुगे सोडले गेले.अन निष्ठावंत कुंपणाबाहेरपाथर्डी फाट्यावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी मुख्यमंत्री येण्याच्या काही क्षण आधीच पालकमंत्री गिरीश महाजन दाखल झाले. त्यांचवेळी भाजपात नव्याने दाखल झालेले नेते घुसले. शिस्तीची परंपरा असलेले मूळ भाजपवाले पुतळ्याच्या कुंपणाबाहेरच राहिले. मुख्यमंत्री आल्यानंतरदेखील नवागतच त्या कुंपणाच्या आतमध्ये पोहोचले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019