शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

Vidhan Sabha 2019 : नारायण राणेंचं ठरलं, भुजबळांचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 04:46 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -खासदार नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही सुपुत्रांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही सुपुत्रांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपला महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षही ते भाजपात विलीन करणार आहेत. राणे खरोखरच भाजपात आले तर राष्टÑवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत जाणार का, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.बऱ्याच दिवसांपासून नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा भाजप प्रवेश लांबल्याचे सांगितले जात होते. स्वत: राणे यांनीच भाजपप्रवेशाची घोषणा मंगळवारी कणकवलीत केली. मात्र, त्यांचा प्रवेश कधी आणि कुठे होणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. तसेच राणेंच्या घोषणेला भाजपकडून कोणीही सकारात्मक उत्तर दिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा शब्द दिला असून प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत होऊ शकतो, असा दावा राणे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राणे पिता-पुत्रांचा भाजपात प्रवेश झाला तर नीतेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी द्यावी लागेल. शिवाय, शिवसेनेची नाराजीही ओढावून घ्यावी लागेल.सध्या भाजप-शिवसेनेचे जागा वाटपाचे घोडे अडले आहे. शिवसेनेच्या म्हणण्यानुसार फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला भाजप नेत्यांना मान्य नाही. भाजपच्या राज्य नेतृत्वाने १२० जागांचा प्रस्ताव पुढे केला आहे. तर केंद्रीय नेतृत्व ११५ च्यावर एकही जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे जागा वाटपाची बोलणी थांबली आहे. उद्या कदाचित जर युती झाली नाही, तर नारायण राणे यांच्या सारखा कोकणातील सक्षम नेता आपल्याकडे असावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी राणेंना जवळ केले असावे. तर दुसरीकडे,'राणे तुमचे तर, भुजबळ आमचे' अशी चर्चा शिवसेनेत सुरु झाली आहे.छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. भुजबळांच्या संभाव्य प्रवेशावरून शिवसेनच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांत दोन गट पडले. काहीनी विरोध केला तर काहीजण भुजबळांच्या स्वागतास तयार आहेत. परवा राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथे राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर होते. भुजबळांच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पत्रकारांनी याविषयी विचारले असता, पवार म्हणाले, मुंबईत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची जागा वाटपावर चर्चा आहे. त्याबैठकीला भुजबळ गेले आहेत. पवारांच्या या खुलाशानंतरही कार्यकर्त्यांच्या मनात पाल चुकचुकलीच.शिवसेनेत भुजबळांना मानणारा एक गट आहे. या गटाच्या नेत्यांचे म्हणणे असे की, जर राणे भाजपात जाणार असतील, भुजबळांना सेनेत घेण्यास काहीच हरकत नसावी. राणेंच्या प्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकत वाढू शकते. त्याला ‘काउंटर’ करण्यासाठी भुजबळांना शिवसेनेत घेतले गेले तर आश्चर्य वाटायला नको. शेवटी, राजकारणात काहीही घडू शकते, हेच खरे!

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019