शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचा चढता आलेख , एनसीआरबीचा अहवाल : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्याचा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:26 IST

मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग....

- मनीषा म्हात्रेमुंबई : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग, बलात्कार, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांत बालकांचा समावेश वाढत चालला आहे, ही गंभीर बाब आहे.एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात बालगुन्हेगारीचे ३५ हजार ८४९ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मध्य प्रदेश अग्रस्थानी आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण ७,३६९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. राज्यात एकूण ६ हजार ६०६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये बालगुन्हेगारांकडून झालेल्या हत्येच्या आकडा १३०वर पोहोचला आहे. तर अल्पवयीन मुलांकडून २५८ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. आरोपींमध्ये १२ वर्षांखालील मुलेही आहेत, ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत ७,७१२ बालगुन्हेगारांना विविध गुन्ह्यांत ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक ते १२वी इयत्तेपर्यंत शिकणाºया बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे.अनेक बालगुन्हेगार मौजमजेसाठी पैसे लागत असल्याने गुन्हेगारीकडे वळतात. दिवसभर सुरू असणाºया विविध वाहिन्या, गुन्हेगारी मालिका, स्पर्धात्मक जगामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा मिळणे ही मानसिकता; तसेच मित्रांची संगत, पालकांचे पुरेसे नियंत्रण नसल्याने मुले चुकीच्या मार्गाकडे वळतात. काही सराईत गुन्हेगार पैशांचे आमिष दाखवून बालकांचा गुन्ह्यांमध्ये वापर करून घेतात. घरातील आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती तसेच चुकीच्या मित्रांची साथसंगतदेखील मुलांना बालगुन्हेगारीकडे वळण्यास प्रवृत्त करीत असल्याचे दिसून येत आहे. केवळ पैशांसाठीच नाही, तर विकृतपणे लैंगिक आकर्षणापोटी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कारवाईतील अडचणीबालगुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नोंद करून बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येते. गुन्ह्याचे स्वरूप पाहून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली जाते. जिल्हा सत्र न्यायालयात बालगुन्हेगारांच्या जामिनासाठी अर्ज करावा लागतो.कोर्टाच्या परवानगीनंतर त्याला बालसुधारगृहात ठेवायचे अथवा जामिनावर सोडून पालकांच्या ताब्यात द्यायचे, याबाबत गुन्ह्याचे स्वरूप पाहून निर्णय घेण्यात येतो. यानंतर बालसुधारगृहातील बाल न्याय मंडळापुढे त्याची केस सुरू होते. त्यानंतर साक्षीपुरावे पाहून बाल न्याय मंडळ त्यावर निर्णय घेते.पकडलेल्या बालगुन्हेगाराला अटक करता येत नाही. त्याला कारागृहात अथवा लॉकअपमध्ये ठेवता येत नाही. खाकी वर्दीची दहशत बसू नये म्हणून साध्या वेशातील कर्मचारी चौकशीसाठी येतात. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घ्यायचे ठरले तर बाल न्याय मंडळाला अर्ज करावा लागतो.  शैक्षणिक वर्गीकरणानुसारशिक्षण    अटक बालगुन्हेगार    निरक्षर    ४२०प्राथमिक शिक्षण    २७६४दहावी नापास    ४१२९१२वी पास    ३९९ 

 

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार