शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

स्वच्छतेत महाराष्ट्र देशात तिसरे; मात्र प्रमुख शहरांची घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 06:12 IST

स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला खरा;

मुंबई : स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला खरा; परंतु मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या प्रमुख महानगरांचा क्रमांक यंदा घसरला आहे. केवळ नवी मुंबई महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली असून राष्टÑीय पातळीवर नवी मुंबईने सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गतवर्षी हे शहर नवव्या क्रमांकावर होते.केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९' चे निकाल बुधवारी घोषित केले. छत्तीसगडने पहिला क्रमांक पटकावला, तर झारखंड दुसऱ्या स्थानी आहे. मध्य प्रदेशमधील इंदुर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. इंदुरने हा मान सलग तीनवेळा मिळवला आहे. महाराष्ट्राचा पुरस्कार स्वच्छ भारत मिशनच्या संचालक मनीषा म्हैसकर यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. देशातील पहिल्या २० शहरांमध्ये नवीमुंबई आणि कोल्हापूरचा समावेश आहे. तर उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा देशात अव्वल ठरली असून, राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.यंदाही नागपूरची घसरणस्वच्छेत गत वर्षी ५५ क्रमांकावर असलेला नागपूरचा क्रमांक ५८ वर पोहचला. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असताना, स्वच्छतेच्या बाबतीत स्थानिक प्रशासन अपेक्षित उपाययोजना करू न शकल्याने नागपूर पुन्हा तीन अंकाने पिछाडीवर गेले. नागपूरच्या घसरणीला घणकचरा व्यवस्थापन कारणीभूत ठरले आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात मनपा अपयशी ठरली आहे.सोलापुरात सुधारणास्वच्छता सर्वेक्षणात गतवर्षी ८६ व्या स्थानी असलेली सोलापूर महापालिकेने यंदा ५४ व्या क्रमाकांवर मजल मारली आहे. महापालिकेच्या वतीने भोगाव येथील कचरा डेपोच्या जागेवर बायोएनर्जी प्रकल्प राबविला जातो. त्याचेही जादा गुण मिळाले.कोल्हापूर सुधारतेयशहर स्वच्छ ठेवण्याकरिता सामूहिकरीत्या व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या जोरावर कोल्हापूर शहराने १६ वा क्रमांक मिळविला आहे. गतवर्षी ७४ वा क्रमांक आला होता. पश्चिम व दक्षिण महाराष्टÑातील कोल्हापूर शहर हे प्रमुख शहर मानले जाते. या शहराचा भौगोलिक विस्तार झाला नसला तरी सुविधांमध्ये बºयाच सुधारणा होत आहेत.पुणे इथेही उणे!‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ च्या सर्वेक्षणामध्ये पुणे महापालिकेचा स्वच्छतेच्या मानांकनाचा टक्का घसरला असून, दहा लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये पुणे महापालिकेला १४ वा क्रमांक मिळाला. गत वर्षी दहावा क्रमांक मिळाला होता. महापालिकेने थ्री स्टार मानांकनासाठी अर्ज केला होता, परंतु यासाठी अपेक्षित पात्रता पूर्ण न केल्याने २०० गुण कमी झाले. खासगी संस्थेने योग्य पद्धतीने डॉक्युमेंटेशन न केल्याने पुणे महापालिकेचा स्वच्छतेचा टक्का घसरल्याचे सांगितले जात आहे.नाशिकचाही नंबर घसरलास्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक क्रमांक टॉप टेनमध्ये येणार असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी स्वच्छतेत सलग दुसºया वर्षीदेखील नाशिकचा क्रमांक घसरला आहे. गेल्यावर्षी नाशिकचा क्रमांक ६३ होता आता तो ६७ झाला आहे. हगणदारीमुक्ती तसेच सेवास्तराचे गुणांकन घसरल्याने महापालिकेला मोठा फटका बसला आहे.औरंगाबादची कचराकोंडीस्वच्छ भारत अभियानात मागीलवर्षी देशभरात १२८ वा क्रमांकावर असलेल्या औरंगाबादला यंदा २२० व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १६ फेब्रुवारी २०१७ पासून औरगाबाद शहरात अभुतपूर्व कचरा कोंडी सुरू आहे. राज्य शासनाकडून ९० कोटींचे अनुदान मिळाल्यानंतरही कचरा प्रक्रियेत महापालिकेने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. या कचराकोंडीमुळेच शहराचा क्रमांक घसरला आहे.>अस्वच्छतेत आघाडीशहर 2019 2018पुणे 14 10मुंबई 49 18नागपूर 58 55नाशिक 67 63औरंगाबाद 220 128>महाराष्टÑाची कामगिरी घनकचरा व्यवस्थापनातलातूर देशात अव्वलनवी मुंबईत नागरिकांचा सर्वाधिक सहभागकोल्हापुर जिल्ह्यातीलपन्हाळा देशात १७ वेअहमदनगर छावणीमंडळ नाविण्यपूर्णपश्चिम विभागात लोणावळा दुसºया क्रमांकाचेस्वच्छ शहरदक्षिण विभागात कºहाड प्रथम, तर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तिसºया स्थानीइस्लामपूरनेहीपटकावला पुरस्कार 50 हजार लोकसंख्येच्या शहरात वीटा (सांगली), इंदापूर (पुणे) व देवळाली प्रवरा (अहमदनगर) या तीन शहरांनी पटकावले बक्षीस 25हजार लोकसंख्येच्या शहरात मौदा, मलकापूर आणि पोभर्णाचा समावेश>मुंबईचा स्वप्नभंग!ओला व सुका कचरा वर्गीकरण, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच कचºयावर प्रक्रिया तसेच घरोघरी जाऊन कचरा उचलण्याच्या मोहिमेनंतरही केंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेची घसरण झाली आहे. सन २०१८ मध्ये १८ व्या क्रमांकावर असलेल्या मुंबईची स्वच्छतेच्या परीक्षेत यंदा पिछेहाट झाली आहे. थ्री स्टार रेटिंगची स्वप्न पाहणारी मुंबई चक्क ४९ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मात्र मरीन ड्राइव्ह येथे गेल्या वर्षी बांधलेले वातानुकूलित प्रसाधनगृह सर्वोत्कृष्ट तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला आहे. यासोबतच वांद्रे येथील नागरिकांच्याच पुढाकाराने उभारण्यात आलेल्या कचºयापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाचेही कौतुक झाले असल्याचे सहायक आयुक्त किरण दिग्गवकर यांनी सांगितले.