शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवीन याेजनांना कात्री; जुन्यांना खात्री; मुख्यमंत्री ६ मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प; आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 05:15 IST

Maharashtra State Budget 2026 :

- यदु जोशी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वारेमाप खर्चाच्या नवीन योजनांचा अंतर्भाव हा मुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे ६ मार्च रोजी विधानसभेत मांडणार असलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नसेल. आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. कालबाह्य योजना बंद करणे किंवा त्यात काळानुरूप बदल करण्याचे सुतोवाच ते अर्थसंकल्प मांडताना करतील, अशी शक्यता आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल हा ५ मार्चला विधिमंडळात मांडला जाणार आहे. 

लाडकी बहीण योजनेमुळे वर्षाकाठी ३६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा राज्य सरकारवर पडत आहे. राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती लक्षात घेता नवीन मोठी योजना अर्थसंकल्पात जाहीर होण्याची शक्यता नाही. पुढील साडेतीन वर्षे आता कोणतीही मोठी निवडणूक होणार नसल्याने लोकप्रिय योजनांची घोषणा करण्याची राजकीय अपरिहार्यता नसेल. राज्य सरकारवर मोठा आर्थिक भार येणार नाही; पण त्यातून सरकारची प्रतिमा उंचावेल, अशा पद्धतीच्या काही योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेषत: कॉर्पोरेट कंपन्यांकडून सीएसआरद्वारे योजनांची अंमलबजावणी याचाही विचार केला जाऊ शकतो. 

राज्यावरील कर्जाचा बोजा ९ लाख कोटींवर राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा ९ लाख कोटी रुपयांवर आधीच गेलेला आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादेतच राज्य सरकारने कर्ज घेतलेले असले तरी राज्याची वित्तीय स्थिती मोठ्या खर्चाच्या नवीन योजनांची घोषणा करण्याइतपत सक्षम नाही आणि आज त्याची राजकीयदृष्ट्या गरजही नाही. त्यामुळे हाती घेतलेल्या योजना आणि पायाभूत सुविधा, सिंचनासह असे प्रकल्प ज्यांची उभारणी आधीच सुरू झालेली आहे ते प्राधान्याने पूर्ण करण्यावर फडणवीस यांचा भर असेल. 

महामंडळांच्या मनमानीवर बडगा?  आगामी अर्थसंकल्पात कठोर शिस्त दिसेल, असे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच म्हटले होते. त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध महामंडळे मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्यासाठी एकात्मिक नियंत्रण प्रणाली आणून शिस्तीचा बडगा मुख्यमंत्री उचलणार का, याबाबत उत्सुकता आहे. याशिवाय राज्याचे आर्थिक उत्पन्न वाढवायसाठी मुख्यमंत्री कोणत्या उपाययोजना जाहीर करतात, याकडेही लक्ष असेल.  

कालबाह्य योजनांमध्ये काळानुसार बदल ज्या योजना आज कालबाह्य झाल्या आहेत त्या बंद करण्याऐवजी सध्याच्या गरजांनुरूप त्या नवीन रूपात कशा आणायच्या यावर राज्य सरकार विचार करत आहे. ‘माणसाला आयुष्य असते; पण योजनांना नाही, त्या कालबाह्य झाल्या तरी सुरूच राहतात आणि सरकार त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत राहते, ही आजवरची परिस्थिती बदलण्याचा विचार होत असून त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : New schemes cut, old assured; State budget on March 6.

Web Summary : Maharashtra's budget prioritizes ongoing projects amid financial constraints. New schemes unlikely due to existing debt and focus on fiscal discipline. Attention will be given to modifying outdated schemes and controlling state corporation spending.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस