शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा कहर! रुग्ण वाढीचा धडकी भरवणारा वेग; आकडेवारीनं राज्याची चिंता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 22:23 IST

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय वेगानं वाढला आहे.

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. एका बाजूला कोरोना लसीकरणाचा वेग वाढत असताना दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. आज राज्यात १५ हजार ८१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापैकी १ हजार ६४६ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत.राज्यात आज १५ हजार ८१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ११ हजार ३४४ जणांना डिस्चार्ज मिळाला. राज्यात आज ५६ कोरोना रुग्ण दगावले. राज्यात आतापर्यंत २२ लाख ८२ हजार १९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २१ लाख १७ हजार ७४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५२ हजार ७२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला १ लाख १० हजार ४८५ जणांवर उपचार सुरू आहेत.कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारीगेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. ८ मार्चला राज्यात ८ हजार ७४४ रुग्णांची नोंद झाली. ९ मार्चला रुग्णांचा आकडा ९ हजार ९२७, १० मार्चला १३ हजार ६५९, ११ मार्चला १४ हजार ३१७ आणि १२ मार्चला १५ हजार ८१७ वर पोहोचला. 

मुंबईत एका दिवसात १ हजार ६४६ बाधित आढळले असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडाही आता १२ हजार ४८७ वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रसार मुंबईत पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता १९६ दिवसांवर आला आहे. 

गेल्या आठवड्यापासून मुंबईत दररोज एक हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. डिसेंबर २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येऊ लागल्याने रुग्णांची संख्या पाचशेपर्यंत कमी झाली होती. मात्र यामध्ये आता पुन्हा वाढ झाल्यानंतर आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद शुक्रवारी झाली. शुक्रवारी १ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा समावेश आहे. यापैकी तीन रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, दोन रुग्ण ४० वर्षांखालील आणि दोन रुग्ण ६० वर्षांवरील आहेत. आतापर्यंत ११ हजार ५१९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३५ लाख १६ हजार ८७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस