शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:34 IST

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाने मुंबईसह राज्य आणि देशाला झोडपून काढले

मुंबई : जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाने मुंबईसह राज्य आणि देशाला झोडपून काढले असून, २१ सप्टेंबरपर्यंतच्या मान्सूनच्या नोंदीचा विचार करता महाराष्ट्रात १ हजार २५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात सरासरी या काळात ९५४.६ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात या वेळी ३२ टक्के जास्त पाऊस पडला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादरा नगर हवेली येथे देशात सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्याखालोखाल सिक्कीम, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार येथे जास्त पावसाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल येथे कमी पावसाची नोंद झाली असून, सर्वांत कमी पाऊस मणिपूरमध्ये झाला आहे.राज्यनिहाय पाऊस मिलीमीटरमध्येजम्मू-काश्मीर ४२७.७हिमाचल प्रदेश ६३३.३पंजाब ४०८.२हरयाणा २४६.०उत्तराखंड ८७९.०उत्तर प्रदेश ५९६.१बिहार ७८४.७सिक्कीम १८२६.४आसाम १२३४.८अरुणाचल प्रदेश १४४५.४नागालँड ८८०.२मणिपूर ५३१.७मिझोराम १५५०.८त्रिपुरा १३८३.८मेघालय २२८४.६पश्चिम बंगाल १३११झारखंड ६९२.५ओडिशा १११४.८छत्तीसगड ११४५.२तेलंगणा ७२४.९आंध्र प्रदेश ४८९.३तामिळनाडू ३३०.0पद्दूचेरी ५०६.८केरळ २२१९.४कर्नाटक ९५०.७गोवा ३८७४.९महाराष्ट्र १२५७.७दादरा ३५६९.६नगर हवेलीमध्य प्रदेश १२३३.१गुजरात ८८४.७राजस्थान ५४९.९लक्षद्वीप ११६०.८अंदमान निकोबार- २२८७.२

टॅग्स :Rainपाऊस