शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र तिसरा, जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षित

By मनीषा म्हात्रे | Updated: June 18, 2023 12:09 IST

धक्कादायक बाब म्हणजे महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश व राजस्थाननंतर महाराष्ट्रात अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. 

दक्षिण मुंबईच्या महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात तरुणीवर अत्याचार करत घडलेल्या हत्येच्या घटनेने मुंबई हादरली. त्यापाठोपाठ परीक्षेला निघालेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीवर लोकलमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश व राजस्थाननंतर महाराष्ट्रात अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचे नाव सुरुवातीच्या तीन राज्यांमध्ये येते. एनसीआरबीच्या २०२१ च्या आकडेवारीनुसार, देशात महिलांवरील अत्याचारांचे एकूण ४ लाख २८ हजार १७८ गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात (५६,०८३) त्यानंतर राजस्थान (४०,७३८) आणि महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक (३९,५२६) लागतो.हल्ले आणि त्यांच्या विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे ओडिशामध्ये (१४,८५३) त्यानंतर महाराष्ट्रात (१०,६५८) नोंदवण्यात आले होते.बलात्कारांच्या घटनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा (२,४९६) देशात चौथा क्रमांक लागतो. या यादीत राजस्थान (६,३३७), मध्य प्रदेश (२,९४७) आणि उत्तर प्रदेश (२८४५) हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.बाललैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या बाबतीतही महाराष्ट्रात (६,११६) उत्तर प्रदेशानंतर (६,९७०) सर्वांत जास्त गुन्हे नोंदवण्यात आले.

जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षितमहिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये आरोपी हे नातेवाईक, शेजारी, परिचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील महिला जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षित असल्याचेही वेळोवेळी पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे.

महिला आयोगाकडून तक्रारींचा निपटाराराज्य महिला आयोगाकडे ऑक्टोबर २०२१ ते मे २०२३ दरम्यान १६,६२९ तक्रारी आल्या. त्यापैकी १५ हजार ९२३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ७०६ तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहे. यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक १,०८६ तक्रारींची नोंद झाली होती. यामध्ये गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ८,९५७ गुन्हे नोंद झाले. तर, यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान ४,८६३ तक्रारींचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी