शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा, या छोट्या राज्यांनी महाराष्ट्राला टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:18 IST

देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणाºया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

पुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात महाराष्ट्राचा क्रमांक देशात शेवटून दुसरा लागला. शेजारचे छोटेसे छत्तीसगड राज्य देशात अव्वल आले आहे. यंदा नीटचा कट आॅफ गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ गुणांनी वाढला आहे.

देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणाºया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ७९ हजार ९७४ विद्यार्थी पात्र ठरले असून राज्याचा निकाल ४०.९५ टक्के लागला आहे. देशात नागालँडचा निकाल सर्वात कमी ४०.५० टक्के लागला असून त्यापेक्षा महाराष्ट्राचा निकाल किंचित बरा आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र नीट परीक्षेत शेवटून चौथ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी निकालात महाराष्ट्राच्या खाली असलेल्या मेघालय व मिझोराम राज्यांनीदेखील यंदा महाराष्ट्राला मागे टाकले आहे.

प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक हरीश बुटले म्हणाले, नीट परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का घसरत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरणकर्ते, संस्थांचालक, शिक्षक-पालक, विद्यार्थी अशा सर्वांनाच हा निकाल गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय राज्याचा ‘नीट’ टक्का वाढणार नाहीे.छोट्या राज्यांनी घेतली निकालात आघाडी -यंदा निकालात छत्तीसगड व दिल्ली अव्वल दोन क्रमांकावर असून छत्तीसगडचा निकाल ७५.६४ टक्के तर दिल्लीचा निकाल ७५.४९ टक्के लागला आहे, तर हरियाणाचा निकाल ७२ टक्के लागला. तसेच केरळसारख्या लहान राज्याचा निकाल ६३.९४ टक्के असून कर्नाटकचा निकाल ६१.५६ टक्के आहे.अभ्यासक्रम कोणताही असला तरी नीट सारख्या प्रवेश पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी वेगळी तयारी लागते. राज्यात त्यासाठी सेंटर उभे करावे लागतील. तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महत्वाकांक्षा बाळगून त्यादृष्टीने तयारी करावी लागेल. तेव्हाच निकाला वाढ होऊ शकेल.- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरStudentविद्यार्थी