मोहोपाडा / पनवेल : जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य असून, देशात झालेल्या गुंतवणुकीपैकी अर्धी गुंतवणूक राज्यात झाली आहे. ‘मेक इन महाराष्ट्र इज आॅफ डुर्इंग बिजनेस’ यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास अधिक गुंतवणूकदार उत्सुक आहेत. भारत हा सर्वाधिक तरु ण लोकसंख्या असलेला देश आहे. या देशातील तरु ण हातांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास ते देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीत आपला सहयोग देऊ शकतील. देशात राज्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाताळगंगा येथे केले. रसायनी पाताळगंगा येथे जपानच्या कोक्युओ व भारताच्या कॅमलिन यांच्या संयुक्त नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.आज जपान व भारत या दोन्ही देशांतील नामवंत कंपनीने कोक्युओ कॅमलिन नावाने महाराष्ट्रात सर्वात मोठी अशी कंपनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)
गुंतवणुकीत महाराष्ट्राला पसंती
By admin | Updated: April 29, 2017 02:13 IST