राज्य सरकारमध्ये नाराज असल्याचे बोलले जात असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला आहे. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शिंदेंनी या कक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असताना जे मुख्यमंत्र्यांचा कक्ष सांभाळत होते त्या मंगेश चिवटे यांची नेमणूक केली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते. यावेळी त्यांच्याकडे विधी व न्याय खाते देखील होते. म्हणून त्यांनी या खात्याशी संलग्न करत उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला होता. हे खाते आताही फडणवीस मुख्यमंत्री असले तरीही फडणवीस यांच्याकडेच आहे. यामुळे तो कक्षही त्याच खात्याशी जोडलेला आहे. यामुळे शिंदे यांना आरोग्य खाते शिवसेनेकडे असल्याने नवा स्वतंत्र कक्ष स्थापन करावा लागला आहे.
अशा परिस्थितीत राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत झाले आहेत. चिवटे यांच्यानुसार शिंदेंनी स्थापन केलेला नवा वैद्यकीय कक्ष हा थेट आर्थिक मदत न देता आरोग्य विभागाशी समन्वय साधून काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
फडणवीसांच्या हँडलचे नाव बदलले?
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे एक्सवर हँडल अस्तित्वात आहे. जे फडणवीस उपमुख्यमंत्री असताना वापरत होते. त्यावर १५ ऑक्टोबर, २०२५ पूर्वीची मदत केलेली अनेक पोस्ट आहेत. यावर आता २९ जानेवारीपासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष असे नाव बदलण्यात आले आहे. तसेच या तारखेपासून नवीन पोस्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे हे हँडल आता मुख्यमंत्री मदत कक्षाचे म्हणून ओळखले जात आहे.