शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या कोंडीसाठी ठाकरे गटाकडून व्हिप, दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 06:58 IST

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे प्रतोद आहेत, तर शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. 

मुंबई : शिवसेनेतील दोन गट विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आमनेसामने येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. तो शिंदे गटातील आमदारांसाठीही लागू असेल का, हा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे प्रतोद आहेत, तर शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. 

अधिवेशन काळात अनेक विधेयके मंजुरीसाठी येणार आहेत. धोरणात्मक बाबीही चर्चेसाठी येतील. अशा वेळी आम्ही जी भूमिका घेऊ  ती शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी लागू असेल असा ठाकरे गटाचा दावा आहे. या भूमिकेला छेद देणारी भूमिका शिंदे गटाकडून नक्कीच घेतली जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठीही ठाकरे गटाची ही खेळी असल्याचे मानले जात आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात २२ ऑगस्टला होणार आहे.

प्रभू यांचा व्हिप आम्हाला लागूच होऊ शकत नाही    शिंदे गटातील एका ज्येष्ठ आमदाराने ‘लोकमत’ला सांगितले की, प्रभू यांनी काढलेला व्हिप आम्हाला लागूच होऊ शकत नाही.     भरत गोगावले यांनी काढलेला व्हिप कायद्यानुसार आम्हाला लागू आहे.     शिवसेनेचे विधानसभेतील पक्षनेते एकनाथ शिंदे आहेत.     प्रतोद गोगावले आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असल्याने प्रभू यांच्या व्हिपला अर्थ उरलेला नाही.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण