शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : 'धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यास, रस्त्यावर उतरू'; बबनराव तायवाडे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 11:53 IST

Maharashtra Politics : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी आता ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

 Maharashtra Politics ( Marathi News ) :  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. या हत्येचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता वाल्मिक कराड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली. दरम्यान, आता यावरुन ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

"या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते"; अभिनेत्रीच्या समर्थनार्थ भाजपा नेत्या सरसावल्या

'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बबनराव तायवाडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. तायवाडे म्हणाले, सरकारच्या तपास यंत्रणा काम करत आहेत. पण, कुठेही मुंडे यांचं नाव समोर आलेलं नाही. ओबीसी नेते मोठा होतोय म्हणून त्यांना जर टार्गेट केलं जात असेल आणि त्यांच्यावर जर अशी वेळ आली तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. त्यांच्यासाठी जे करता येईल ते आम्ही करु, असंही तायवाडे म्हणाले. ते दोषी असतील तर आम्ही दोषी माणसाच्या पाठीशी ओबीसी समाज उभा राहणार नाही, असंही तायवाडे म्हणाले. 

"बीडमध्ये जी घटना झाली त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण, हे प्रकरण डोळ्यासमोर ठेऊन जर ओबीसी समाजाला टार्गेट होणार असेल तर त्याचा आम्ही निषेध करु. मागील एक वर्षापासून त्या परिसरात मराठा आणि ओबीसीमध्ये फूट पडली होती. निवडणुकीत पुन्हा एकत्र आल्याचे दिसत होते, पण आता पुन्हा एकदा ही फूट दिसत आहे, असंही तायवाडे म्हणाले. 

बबनराव तायवाडे म्हणाले, ओबीसी नेता मोठा होतोय म्हणून जर धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. त्यांच्यासाठी जे काही करता येईल तेव्हा आम्ही ते करेन.  ते जर या प्रकरणात दोषी आढळले तर समाज त्यांच्या पाठिमागे उभा राहणार नाही, असंही तायवाडे म्हणाले. 'दोन दिवसापूर्वी जो मोर्चा झाला तो एका समाजाचा नव्हता. त्या मोर्चात सर्वच समाजाचे लोक होते. त्या घटनेचा निषेध व्हायलाच पाहिजे होता. त्या मोर्चाचे आम्ही समर्थन करु. पण, पडद्याच्या मागे राहून दोषी नसल्याच्या व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्यांच्या मागे उभा राहणार, असा इशाराही तायवाडे यांनी दिला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBabanrao Taywadeबबनराव तायवाडे