शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जाहिराती कुणी दिली माहिती नाही, शिवसेनाचा काही संबंध नाही; शंभुराज देसाईंची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 20:15 IST

Maharashtra Politics: राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, अशी जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली आहे.

Maharashtra Politics: राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये आज छापून आलेल्या शिवसेनेच्या(शिंदे गट) जाहिरातीने मोठ गोंधळ उडाला आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, असा उल्लेख करण्यात आला आहे. या जाहिरातीमुळे राज्यात राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या जाहिरातीवर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना शंभूराज देसाई म्हणाले की, 'आजच्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाशी काहीही संबध नाही. सर्वे कुणी केला आणि जाहिरात कुणी छापून आणली, हे आम्हाला माहिती नाही. एखाद्या हितचिंतकाने दिली असावी. आम्ही मित्रपक्ष आहोत, पहिल्या दुसऱ्या पदासाठी आमची रस्सीखेच नाही. हिंदु्वाच्या मुद्यावर केलेली युती आम्ही पुढे नेत आहोत. चांगली गोष्ट आहे की, मुख्यमंत्री पदासाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर युतीचेच नेते आहेत,' अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.

'30 वर्षात अशी जाहिरात कधी पाहिली नाही'या जाहिरातीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणले की, 'गेल्या 30 वर्षात अशी जाहिरात आजपर्यंत कधी आपण पाहिली नाही. एवढे लोकप्रिय आहात तर निवडणुका का टाळता? फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय आहेत, हे भाजपाला मान्य आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला पुन्हा हेच मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे. हे पाहून आनंद झाला, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. या जाहिरातीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा ऐकायला आवडेल, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी केली.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी