शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : "ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी..."; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन फडणवसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:16 IST

Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप विरोधकांनी केला.

Maharashtra Politics :  विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' गेमचेंजर ठरली आहे. या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करत असतात. सध्या ही योजना निधीवरुन चर्चेत आहे. या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत असेत. काही दिवसांपूर्वी सामाजिक विधी व न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळल्याचे सांगितले जात होते. आता, या योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या आधीही आदिवासी विभागाचा निधी दोनवेळा वर्ग करण्यात आल्याचा दावा केला होता. दरम्यान, आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

"राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही, तेच अशाप्रकारे आरोप करतात. कारण, अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनीही सभागृहात खुलासा केला आहे, असंही फडणवीस म्हणाले. 

"या विभागांचे बजेट पावणे दोन पटींनी वाढले आहे, त्यामुळे ही अकाऊंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही. अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं, अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक मी लिहिलेला आहे, ते पुस्तक मी त्यांना देईन, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसladki bahin yojanaलाडकी बहीण योजना