शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Disha Salian Case: दिशा सालियानला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन; मनीषा कायंदे म्हणाल्या, राजकीय रंग नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:46 IST

Maharashtra Politics : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याबाबत तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) :  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेंजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे.  दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेत केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आरोप सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेनेच्या आमदारांनी फलक घेऊन आंदोलन केले. 

Maharashtra Politics :'तीन वर्षे आमचेच सरकार, तपासात काही सापडले नाही'; एकनाथ शिंदेंचे आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलले

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची 'सीबीआय'कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या हत्येत दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आंदोलना दरम्यान केली.  

"दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव येत आहे. सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का? दबाव टाकला का? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. पाच वर्ष न्याय न मिळाल्याने दिशा सालियन हीचे वडील न्यायालयात गेल्याचे आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या.  

संजय गायकवाड यांनी ठाकरेंची पाठराखण केली

आज माध्यमांसोबत बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, दिशा सालियान प्रकरणात सीआयडीच्या तपासात राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत नाही, जे तपासात समोर आलंय ते सांगतोय.कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते. कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. पण मागची तीन वर्षे आमचेच सरकार सत्तेवर होते, असंही संजय गायकवाड म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेCourtन्यायालयDisha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरण