शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:45 IST

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. आता नव्या मुख्यमंत्र्‍यांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांना की एकनाथ शिंदे यांना मिळणार यावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहेत. दरम्यान, भाजपाच्या प्रवक्त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी बिहार फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे संकेत दिले  आहेत. 

काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. पण मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेंस कायम आहे. 

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले की, नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. महाराष्ट्रात शिवसेनेकडून अशी कोणतीही बांधिलकी करण्यात आली नाही. आम्ही बिहारमध्ये जनता दल सोबत युती केली जेणेकरून भाजप राज्यात प्रवेश करू शकेल, जे झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही हे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला

प्रेम शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले की, बिहारमध्ये लागू केलेले मॉडेल महाराष्ट्रासाठी योग्य नाही. महाराष्ट्रात अशी बांधिलकी असण्याचे कारण नाही, कारण आपल्याकडे मजबूत संघटनात्मक पाया आणि नेतृत्व आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. याउलट, मुख्यमंत्र्यांचा निर्णय निवडणुकीच्या निकालांवर आधारित असेल, असे सर्वोच्च नेतृत्वाने निवडणुकीदरम्यान सांगितले होते.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निवडणूक समन्वयक रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांचा दावा फेटाळून लावला. 

दानवे म्हणाले, मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांनी आधीच त्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती केली आहे आणि भाजप लवकरच नेता निवडणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElectionनिवडणूक 2024