शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

Maharashtra Political Crisis: राजसत्तेचा सुलभ मार्ग गुवाहाटी व्हाया सुरत! दोन दिवसांत सहा आमदार गेले सुरतमार्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 08:25 IST

Maharashtra Political Crisis:शिवसेनेतून बंड करुन आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीत पोहोचलेले नेते एकनाथ शिंदे यांचा सत्तेचा नवीन समीकरणाचा मार्ग यशस्वी होण्याचे आशादायी संकेत मिळू लागताच शिवसेनेतील इतर आमदारही गुवाहाटीत दाखल होत आहेत.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : शिवसेनेतून बंड करुन आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीत पोहोचलेले नेते एकनाथ शिंदे यांचा सत्तेचा नवीन समीकरणाचा मार्ग यशस्वी होण्याचे आशादायी संकेत मिळू लागताच शिवसेनेतील इतर आमदारही गुवाहाटीत दाखल होत आहेत. मात्र गुवाहाटी गाठताना हे आमदार व्हाया सुरत जात असल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात सहा आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सोमवारी रात्री सुरतला दाखल झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला होता. पुढे महाराष्ट्रातील सत्तांतराच्या षडयंत्राचा डाव बदलत गेला आणि बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास शिंदे व त्यांचे समर्थक आमदार सुरत सोडून गुवाहाटीला रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एकनाथ शिंदे सुरतला दाखल झाले त्यावेळी त्यांच्यासोबत २७ आमदार होते. मात्र सुरतच्या हॉटेलमध्ये मुक्काम असतानाच २४ तासात ही संख्या ३३ पर्यंत गेली. हे सर्व ३३ जण सुरतच्या विमानतळावरुन विशेष विमानाने गुवाहाटीला गेले. त्यानंतरही मात्र शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. 

धोका नको म्हणून नेले जात आहे सुरतमार्गे मुंबईत शिवसेनेचा दबदबा असल्याने धोका नको म्हणून सुरतमार्गे गुवाहाटीकडे हे आमदार जात असल्याचे सांगितले जात असले तरी एकनाथ शिंदे यांचे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य होते तेथेच काहीतरी ‘शिजत’ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या सत्तांतराच्या घडामोडीत ‘सुरत’ केंद्रस्थानी बनल्याचे मानले जात आहे. 

दिमतीला विशेष विमान- या समर्थनासाठी गेल्या दोन दिवसात अनेक आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. मात्र गुवाहाटीला जाताना हे आमदार सुरत व्हाया जात असल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. - एकनाथ शिंदे सुरतमधील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच हॉटेलमधून बुधवारी सायंकाळी तीन आमदार विशेष विमानाने गुवाहाटीकडे रवाना झाले. गुरुवारीदेखील सकाळी अशाच पद्धतीने पुन्हा तीन आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र