शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी', शरद पवारांच्या एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:31 IST

Maharashtra Political Crisis: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे.

Eknath Shinde: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. राज्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणामुळे अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. ''एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे,'' असे शरद पवार म्हणाले.

जयंत पाटलांच्या शुभेच्छा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील एकनाथ शिंदे यांना शुभेच्य़ा दिल्या. ''एकनाथरावजी शिंदे यांचे माझ्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन ! महाराष्ट्र हे एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी यांनी राज्याला अजून नव्या उंचीवर न्यावे, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो,'' असे जयंत पाटील म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदेंना शुभेच्छा दिल्या.

सायंकाळी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधीगेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष आज संपला. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. तसेच, भाजप शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देईल आणि अपक्षांसह भाजपचे लोकही सत्तेत सहभागी होतील, असे फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे, स्वतः फडणवीस सत्तेत मंत्रिमंडळात नसतील. दरम्यान, आता सायंकाळी 7.30 वाजता एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारChief Ministerमुख्यमंत्री