शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे तेव्हाच एकनाथ शिंदेंची पक्षातून हकालपट्टी करणार होते? खळबळजनक माहिती समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 21:47 IST

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्यासाठी वर्षभरापासून शिवसेनेतूनच जोरदार हालचाली सुरू होत्या?

Maharashtra Political Crisis:शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिंदे आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन गेलयामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बंडखोर मंत्र्यांचे खाते काढून घेतले. यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे. 

शिंदेंना पक्षातून काढणार होते?21 जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या गटाने सरकारविरोधात बंड पुकारले. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर्षभरापूर्वीच बाहेरचा रस्ता दाखवणार होते. 

हे होते कारण...2019 मध्ये भाजपशी युती तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. यातून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. पण, यानंतरही एकनाथ शिंदे भाजपशी जवळीक साधत होते. शिंदे आणि भाजप यांच्यातली जवळीक उद्धव ठाकरेंना नापसंत होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना पक्षातून बाहेर काढणार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिवसेनेतूनच जोरदार हालचाली सुरू होत्या, अशीही माहिती मिळत आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना