उद्धव ठाकरे तेव्हाच एकनाथ शिंदेंची पक्षातून हकालपट्टी करणार होते? खळबळजनक माहिती समोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 09:46 PM2022-06-28T21:46:28+5:302022-06-28T21:47:18+5:30

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्यासाठी वर्षभरापासून शिवसेनेतूनच जोरदार हालचाली सुरू होत्या?

Maharashtra Political Crisis | Eknath Shinde revolt | Uddhav Thackeray was going to expel Eknath Shinde from the party? | उद्धव ठाकरे तेव्हाच एकनाथ शिंदेंची पक्षातून हकालपट्टी करणार होते? खळबळजनक माहिती समोर...

उद्धव ठाकरे तेव्हाच एकनाथ शिंदेंची पक्षातून हकालपट्टी करणार होते? खळबळजनक माहिती समोर...

Next

Maharashtra Political Crisis:शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिंदे आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन गेलयामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बंडखोर मंत्र्यांचे खाते काढून घेतले. यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे. 

शिंदेंना पक्षातून काढणार होते?
21 जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या गटाने सरकारविरोधात बंड पुकारले. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर्षभरापूर्वीच बाहेरचा रस्ता दाखवणार होते. 

हे होते कारण...
2019 मध्ये भाजपशी युती तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. यातून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. पण, यानंतरही एकनाथ शिंदे भाजपशी जवळीक साधत होते. शिंदे आणि भाजप यांच्यातली जवळीक उद्धव ठाकरेंना नापसंत होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना पक्षातून बाहेर काढणार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिवसेनेतूनच जोरदार हालचाली सुरू होत्या, अशीही माहिती मिळत आहे. 

Web Title: Maharashtra Political Crisis | Eknath Shinde revolt | Uddhav Thackeray was going to expel Eknath Shinde from the party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.