शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election : पोलिसाला सहन झाली नाही थट्टा! स्वाभीमानाने परत केला निवडणूक भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:18 IST

Maharashtra Municipal Election : निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात येणाऱ्या भत्त्यावरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

कल्याण : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकशाहीच्या उत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हजारो पोलीस कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली. मात्र, कल्याण पूर्व विभागातील एका केंद्रावर निवडणूक ड्युटीसाठी देण्यात आलेल्या तुटपुंज्या भत्त्यावरून संताप व्यक्त होत आहे. कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने केवळ ५०० रुपये भत्ता देण्याच्या शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हे मानधन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

नेमकी घटना काय?कल्याण पूर्व येथील नेतिवली भागातील कल्याण डोंबिवली म.न.पा. शाळा क्र. १९ मधील मतदान केंद्र क्रमांक ९८/३३ (तळ मजला, खोली क्र. १) येथील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मानधनाची एक पावती समोर आली आहे. या तक्त्यानुसार, मतदान केंद्रावरील इतर निवडणूक अधिकाऱ्यांना १५५० ते २००० रुपयांपर्यंत भत्ता देण्यात आला. मात्र, बंदोबस्तावर असलेल्या विलास दादाराव मुंडे या पोलीस कर्मचाऱ्याच्या नावासमोर केवळ ५०० रुपये रक्कम लिहिण्यात आली होती.

स्वाक्षरीऐवजी नोंदवला 'लेखी' निषेधइतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांना मिळणारा भत्ता अत्यंत कमी असल्याचे पाहून विलास मुंडे यांनी भत्त्याच्या रक्कमेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यांनी पावतीवर अधिकृतपणे "देय मान्य नाही, शासन परत" असे लिहून आपला विरोध नोंदवला आहे. दिवसभर उन्हात उभे राहून आणि संवेदनशील केंद्रावर ड्युटी करूनही मिळणारे हे तुटपुंजे मानधन म्हणजे पोलिसांच्या कष्टाची थट्टा असल्याची भावना पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.

पोलिसांमध्ये नाराजीचा सूरनिवडणूक प्रक्रियेत पोलीस कर्मचारी मतदानापूर्वी दोन दिवस आणि मतदानानंतर पेटी जमा होईपर्यंत ड्युटीवर असतात. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांनाही तितकाच किंवा त्याहून अधिक वेळ कामावर राहावे लागते. असे असताना मानधनामध्ये एवढी मोठी तफावत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विलास मुंडे यांनी घेतलेल्या या धाडसी भूमिकेचे सोशल मीडियावर स्वागत होत असून, गृह विभागाने पोलिसांच्या निवडणूक भत्त्याबाबत पुर्नविचार करावा, अशी मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cop Rejects Election Allowance, Citing Disrespectful Payment in Kalyan.

Web Summary : A Kalyan cop refused his election duty allowance of ₹500, protesting the disparity compared to other officials. He labeled it disrespectful, sparking outrage and calls for fair compensation among police. This bold act is gaining social media support.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाKalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Electionनिवडणूक 2026Policeपोलिस