शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

"राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 12:59 IST

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं राजकीय विधान

प्रशांत भदाणे, जळगाव: "राज्याच्या वातावरणात जसं ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे, तसंच ढगाळ वातावरण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपचा जोरदार पाऊस पडणार आहे", असं मोठं राजकीय विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आपल्या काही आमदारांसह महायुतीच्या बाजूने जातील, अशी चर्चा सुरू असतानाच गुलाबराव पाटलांनी हे सुचक विधान केल्यानं खळबळ उडाली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पाळधी येथील निवासस्थानी लोकमतशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटलांनी काही राजकीय आडाखे देखील व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीच्या बाजूने जातील, अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे दोन ते तीन वेळेस नॉटरिचेबल झाल्याचीही चर्चा होती. याच अनुषंगाने मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, हवामानाचा अंदाज असा दिसतोय की राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल असं दिसतंय. अजित पवार आता थांबणार नाहीत, असं मला वाटतं. अजित पवार हे डॅशिंग नेता आहेत. ते नॉटरिचेबल वाला नेता नाहीत. 24 तास काम करणारा माणूस आहे. कोणताही निर्णय घेताना ते घाबरणार नाहीत. सध्या जुळवाजुळव करण्याला थोडा वेळ लागतोय. पण ते जेव्हा होईल तेव्हा शिवसेना भाजपचा पाऊस जोरात पडेल, असं सांगत त्यांनी राजकीय उत्सुकता आणून धरली.

...तर अमर अकबर अँथनी पिक्चर चांगला चालेल!

देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजित पवार एकत्र आले तर राज्याच्या विकासाला चालना मिळेल. अजित पवार सोबत आले तर अमर अकबर अँथनी हा पिक्चर चांगला चालेल, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटील