शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद होणार ‘डिजिटल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 06:21 IST

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली. त्यानंतर काऊन्सिलचे बरेचसे काम या अ‍ॅपद्वारे होऊ लागले. मात्र आता यापुढे जाऊन या काऊन्सिलने संपूर्णत: डिजिटल होण्याचे ठरविले आहे.

मुंबई : काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रवैद्यकीय परिषदेने अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली. त्यानंतर काऊन्सिलचे बरेचसे काम या अ‍ॅपद्वारे होऊ लागले. मात्र आता यापुढे जाऊन या काऊन्सिलने संपूर्णत: डिजिटल होण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता लवकरच या काऊन्सिलचे प्रत्येक व्यवहार, नूतनीकरण व प्रक्रिया आॅनलाइन माध्यमातून होणार आहे.याविषयी अधिक माहिती देताना परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, आतापर्यंत सात लाख कागदपत्रांची माहिती आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणखी चार लाख कागदपत्रे डिजिटल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. १९३० सालापासूनची कागदपत्रे परिषदेकडे आहेत, एखादे कागदपत्र मिळविण्यासाठी, शोधण्यासाठी जवळपास १५-२० दिवस लागतात. त्यामुळे हा मनस्ताप दूर करण्यासाठी आता डिजिटल पद्धत अवलंबिण्यात येत आहे. या डिजिटल पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या डॉक्टरविषयीची तक्रार, डॉक्टरची संपूर्ण माहिती, डॉक्टरांच्या परवान्याचे नूतनीकरण, शुल्क भरणे, नागरिकांच्या तक्रारींसाठीही सोपी पद्धत अंतर्भूत आहे. या डिजिटायझेशनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्त्या सदस्याला आयडी कार्ड आणि क्यूआर कोड देण्यात येणार आहे. याशिवाय, राज्यातील डॉक्टरांसाठी सीएमए सर्टिफिकेट कोर्सही आॅनलाइन सुरू करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या उपस्थितीसाठी वेबकॅम असणे आवश्यक असते. त्यामुळे सीएमएच्या चर्चासंत्रामध्ये सहजरीत्या सहभागी होता येईल, अशी माहिती डॉ. उत्तुरे यांनी दिली.सीएमएचा आॅनलाइन अभ्यासक्रमआॅनलाइन सीएमए अभ्यासक्रमात डॉक्टरांना किमान ७० मिनिटे तरी कॅमेऱ्यासमोर बसावे लागते. जेणेकरून त्यांची उपस्थिती आहे हे कळते. शिवाय, त्यातच त्यांना पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात, ज्यानंतर त्यांनाई-मेलद्वारे प्रमाणपत्र दिले जाते. डिजिटायझेशनच्या पद्धतीमुळे परिषदेच्या व्यवहारांत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा मानस असल्याचेडॉ. उत्तुरे यांनी सांगितले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयMaharashtraमहाराष्ट्र