शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

"फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं": पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:52 IST

देवेंद्र फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Prithviraj Chavan on Devendra Fadnvais : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या मोठ्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केंद्रीय नेतृ्त्वाकडे केली आहे. २८ जागांवर निवडणूक लढणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागांवर यश मिळवलं. पत्रकार परिषदेत आम्ही कमी पडलो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.तसेच पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. यावर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली ते योग्यच केलं असं म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली नेतृत्वाची दिशाभूल केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

"महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला त्याची कोणीतरी जबाबदारी घेणे आवश्यक होते. ती देवेंद्र फडणवीसांनी घेतली. कारण दिल्लीच्या नेतृत्वासमोर त्यांनी ४५ पेक्षा अधिक जागा मिळवणार असल्याचे चित्र निर्माण केले होते. देवेंद्र फडणवीसांनी जो आकडा दिला तो गृहीत धरुन मोदींनी ४०० पारची घोषणा केली. त्यानंतर मोदी तोंडघशी पडली. कोणीतरी त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. विधानसभेसाठी हा प्रयत्न आहे. पण त्यांचा राजीनामा स्विकारला जातो की नाही हे पाहावं लागेल. सकृतदर्शनी देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या नेतृत्वाची दिशाभूल केली त्याची जबाबदारी त्यांना स्विकारावी लागेल. त्यामुळे भाजपचा ग्राउंड रिॲलिटी टच संपलेला आहे. त्यांनी पक्ष फोडाफोडीचे राजकारण केलं आणि त्याला मोदींचा थेट आशीर्वाद मिळवला.  काहीतरी चुकल्याची त्यांना जाणीव झाली हे बरं झालं," असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासोबत  मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल