शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha election results 2024: पवार घराण्याचा विजयातही तिसरा पराभव; चार पिढ्यांचा राजकारणात वावर

By वसंत भोसले | Updated: June 6, 2024 12:14 IST

Maharashtra Lok Sabha election results 2024 : आजवर तीन पराभव पवार कुटुंबीयाच्या सदस्यांचे झाले आहेत. त्यात मंगळवारी लाेकसभेच्या निकालात सुनेत्रा पवार यांची भर पडली.

काेल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहा दशकांच्या राजकारणात त्यांचा कधी, काेणत्याही निवडणुकीत पराभव झाला नाही. मार्च १९६७ पासून ते विधिमंडळ किंवा संसदेचे सलग ५७ वर्षे सदस्य आहेत. मात्र, आजवर तीन पराभव पवार कुटुंबीयाच्या सदस्यांचे झाले आहेत. त्यात मंगळवारी लाेकसभेच्या निकालात सुनेत्रा पवार यांची भर पडली. शरद पवार यांच्या घराण्यातील चार पिढ्यांनी राजकारणात वावर केला आहे. माताेश्री शारदादेवी पवार यांनी लाेकल बाेर्डाच्या निवडणुका यशस्वीपणे लढविल्या हाेत्या. शरद पवार यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षीच बारामतीतून आमदारकीची निवडणूक लढविली आणि जिंकली.  

पहिला पराभव शरद पवार विद्यार्थी असताना १९५८ मध्ये बारामतीचे काँग्रेसचे खासदार केशवराव जेधे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची पाेटनिवडणूक झाली हाेती. काँग्रेसने जेधे यांचे चिरंजीव गुलाबराव यांना उमेदवारी दिली हाेती. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठिंब्यावर शेतकरी कामगार पक्षाकडून शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली हाेती. श्रीमती शारदा पवार या शेकापचे काम करीत हाेत्या. शरद पवार हे काँग्रेसमध्ये काम करीत असल्याने माताेश्रींच्या परवानगीने त्यांनी जेधे यांचा प्रचार केला. त्या पाेटनिवडणुकीत वसंतराव पवार यांचा पराभव झाला.

दुसरा पराभव शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे आदींनी राजकारणात काम करताना अनेक निवडणुका लढविल्या. कधी हार पाहिली नाही. वसंतराव पवार यांच्यानंतर २०१९ मध्ये दुसरा पराभव अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लाेकसभा मतदारसंघातून झाला. पार्थ पवार आणि राेहित पवार यांच्या रूपाने पवार कुटुंबीयांतील चाैथी पिढी राजकारणात आली आहे.

तिसरा पराभव  राष्ट्रवादीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार, अशी फूट पडल्याने बारामती मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, अशी लढत झाली. यात पवार घराण्याचा विजय झाला असला तरी सुनेत्रा पवार यांच्या रूपाने तिसरा पराभवही झाला.

टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल