शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
3
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
4
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
5
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
8
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
9
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
10
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
11
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
12
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
14
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी
15
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
16
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
17
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
18
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
19
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
20
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 

राज्यातील ११ खासदारांची हॅट्ट्रिक रोखली; १० जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली  

By पोपट केशव पवार | Updated: June 8, 2024 07:30 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील दहा खासदारांना मतदारांनी एकदाच संधी दिली. दुसऱ्या वेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहताच त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगले यश मिळवताना अनेक नव्या चेहऱ्यांना संसदेत पाठवले असले तरी या नव्या चेहऱ्यांनीच अनेकांची विजयाची हॅटट्रिक रोखली आहे.

महायुती व महाविकास आघाडीमध्ये  चुरशीचा सामना झाल्याने राज्यातील तब्बल ११ खासदारांना विजयाची हॅटट्रिक करता आलेली नाही, तर दुसरीकडे तब्बल १० खासदारांना जनतेनेच दुसऱ्यांदा संधी नाकारली. या अटीतटीच्या लढतींमध्येही पाच खासदारांनी सलग तीन वेळा जिंकण्याची किमया साधली. 

सन २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळवलेल्या १६ खासदारांनी तिसऱ्या वेळीही विजयासाठी कंबर कसली होती. यात केवळ पाच जणांनाच यश मिळाले. उर्वरित ११ जणांच्या स्वप्नांवर मतदारांनी पाणी फिरविले. यात भाजपचे सहा जण आहेत.

संधी एकदाच, दुसऱ्यांदा केला पराभवराज्यातील दहा खासदारांना मतदारांनी एकदाच संधी दिली. दुसऱ्या वेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहताच त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यामध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर, संजय मंडलिक, नवनीत राणा, सुनील मेंढे, सुजय विखे-पाटील, सुधाकर श्रुंगारे, प्रतापराव पाटील-चिखलीकर, इम्तियाज जलील व डॉ. भारती पवार यांचा समावेश आहे.

यांची हॅट्ट्रिक हुकली डॉ. हीना गावित (भाजप, नंदुरबार), संजय पाटील (भाजप, सांगली), कपिल पाटील (भाजप, भिवंडी), राजन विचारे (उद्धवसेना, ठाणे), सुभाष भामरे (भाजप, धुळे), सदाशिव लोखंडे (शिंदेसेना, शिर्डी), विनायक राऊत (उद्धवसेना, रत्नागिरी-सिंधुदुर्ग), राहुल शेवाळे (शिंदेसेना, मुंबई दक्षिण), रामदास तडस (भाजप, वर्धा), हेमंत गोडसे (शिंदेसेना, नाशिक), अशोक नेते (भाजप, गडचिरोली-चिमूर).

यांनी केली हॅट्ट्रिकअरविंद सावंत (उद्धवसेना, मुंबई दक्षिण)श्रीरंग बारणे (शिंदेसेना, मावळ)श्रीकांत शिंदे (शिंदेसेना, कल्याण)रक्षा खडसे (भाजप, रावेर)संजय जाधव (उद्धवसेना, परभणी).

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४