शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 18:46 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: मला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, असं शरद पवार (Sharad Pawar) का म्हणाले हे मला माहीत नाही, असे  छगन भुजबळ म्हणाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये राहिलो असतो तर तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलेल्या काही दाव्यांमुळे आज राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्यात मी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असती, असा दावाही शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देताना मला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, असं ते का म्हणाले हे मला माहीत नाही, असे  छगन भुजबळ  म्हणाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये राहिलो असतो तर तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ दिवसभर सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी शिवसेना सोडली नसती तरी मुख्यमंत्री झालो असतो, काँग्रेस सोडली नसती तरी मुख्यमंत्री झालो असतो. १९९९ मध्ये काँग्रेसचे अनेक मोठे नेते मी पक्ष सोडू नये, असा आग्रह करत होते. दोन महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हालाच मुख्यमंत्री जाहीर करतो, असे सांगत होते. मात्र मी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष झालो. त्यावेळी पक्षाच्या जिल्हा संघटना तयार झाल्या नव्हत्या. तरीही आम्ही उमेदवार दिले. तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच वेगवेगळे निवडणूक लढवत होते. तर शिवसेना आणि भाजपा एकत्र निवडणूक लढवत होते. त्या निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागला. त्यावेळी असं लक्षात आलं की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर सरकार स्थापन होईल. त्यानंतर आम्ही ते आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यावेळी काँग्रेसचे आमदार जास्त होते. त्यामुळे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले. तर मी उपमुख्यमंत्री झालो. 

दरम्यान, २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता पण पक्ष नेतृत्वाने ते पद काँग्रेसला दिले, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, " २००४ मध्ये मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती.त्यामुळे अधिकची मंत्रि‍पदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावर आम्ही आलो," असं शरद पवार म्हणाले होते. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४