शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी उशिरा जाहीर होणे भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:17 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: १५ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी सात जागांवर आमचा विजय झाला. त्या तुलनेत आमची कामगिरी चांगली राहिली. नवीन राजकीय समीकरणे होती. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. मात्र, या सगळ्या निवडणुकीच्या काळात आमच्या उमेदवारांची उमेदवारी उशिरा घोषित होणे याचा आम्हाला जोरदार फटका बसल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. मनीषा कायंदे(प्रवक्त्या, शिंदेसेना ) 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधक आमच्यावर टीका करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात ते आठ जागांवर बोळवण केली जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, मुख्यमंत्री त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी १५ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी सात जागांवर आमचा विजय झाला. त्या तुलनेत आमची कामगिरी चांगली राहिली. नवीन राजकीय समीकरणे होती. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. मात्र, या सगळ्या निवडणुकीच्या काळात आमच्या उमेदवारांची उमेदवारी उशिरा घोषित होणे याचा आम्हाला जोरदार फटका बसल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक अर्ज भरण्याच्या काही दिवस अगोदर आमच्याकडे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे प्रचारासाठी खूप कमी वेळ उमेदवारांना मिळाला. विरोधकांनी त्यांचे उमेदवार महिनाभर आधीच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी चांगला वेळ मिळाला. ज्याठिकाणी आमच्या जागा आहेत, त्याठिकाणी सहकारी पक्ष त्या जागेची मागणी करत राहिले आणि तो तिढा सोडविण्यात वेळ गेला. या गोष्टींचा उमेदवार निवडीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आमच्या विद्यमान उमेदवारांबाबत नकारात्मक सर्वेक्षण असल्याचे सांगून आयत्यावेळी उमेदवार बदलायला लावले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला त्रास झाला. हे सर्वेक्षण कोणी केले, कुठून केले, याबाबत मला काही माहीत नाही. मात्र या कारणांमुळेही अनेक ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाल्याचे दिसून आले आहे. जर पालघर, यवतमाळ, वाशिम याठिकाणी आमचे उमेदवार दिले असते तर आजचा निकाल वेगळा दिसला असता.

     उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किती मराठी मते मिळाली, याचा शोध घेणे गरजेचे आहे.      ठाकरे यांच्या पक्षाला अल्पसंख्याक समाजाची मते अधिक प्रमाणात मिळाली.      संविधान बदलणार हे चुकीच्या पद्धतीने ‘नॅरेटिव्ह’ विरोधकांनी जनमानसात तयार केले. त्याचाही फटका आम्हाला बसला.      सहकारी पक्ष म्हणून भाजपची चांगली साथ मिळाली. अजित पवार गटाचा किती फायदा झाला, हे तपासावे लागेल.     मुख्यमंत्र्यांनी सहकारी पक्षाचे सर्व उमेदवार निवडून यावेत, यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली होती.     लोकसभा निकालाचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. 

सजग राहावे लागेलज्या चुका लोकसभा निवडणुकीत झाल्या त्या टाळायच्या असतील तर नवीन रणनीती आखावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. तसेच पुन्हा अधिक जोमाने मेहनत करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणूक नजीकच आहे. या पार्श्वभूमीवर सजग राहून कष्ट घेऊ. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv Senaशिवसेना