शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेमधून प्रकाश आवाडे उतरणार लोकसभेच्या रिंगणात, महायुतीला मोठा धक्का

By समीर देशपांडे | Updated: April 12, 2024 14:30 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत. तशी घोषणा त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत केली.

- समीर देशपांडे कोल्हापूर - राज्यात भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत. तशी घोषणा त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत केली.

आवाडे यांच्या या उमेदवारीच्या निर्णयामुळे हातकणंगले मतदारसंघातील राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता आहे. प्रकाश आवाडे म्हणाले सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती पाहता अतिशय अटीतटीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल आवाडे यांनी स्वतंत्र सर्वे केला असता यामध्ये माझ्या नावाला चांगली पसंती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार आपण स्वतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत. निवडून येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची आपली भूमिका आहे. तसेच खासदार कसा असावा, खासदार काय करू शकतो हे मी दाखवून देणार आहे. आपली याबाबत कोणाशीही चर्चा झालेली नसून सध्याच्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. माझी उमेदवारी भाजप पुरस्कृत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Awadeप्रकाश आवाडेhatkanangle-pcहातकणंगलेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४