शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

असाही एक राजीनामा : सभागृहात एकच दिवस गेलेल्या चंद्रपूरच्या खासदाराची गोष्ट!

By राजेश मडावी | Updated: April 2, 2024 11:11 IST

Maharashtra Lok sabha Election 2024: १९६२च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले तत्कालीन चांदा (चंद्रपूर)चे अपक्ष दिवंगत खासदार लाल श्याम शाह हे फक्त एकच दिवस सभागृहात गेले आणि राजीनामा दिला. कोण होते लाल श्याम शाह, त्यांनी राजीनामा कशासाठी दिला, त्याची तशीच प्रेरक कहाणी आहे. 

- राजेश मडावी चंद्रपूर - काहीही करून सत्तेला चिकटून राहणारे, कोलांटउड्या मारत नैतिकतेचा आव आणणारे नेते आज खूप वाढले. अशा अस्वस्थ वर्तमानात १९६२च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले तत्कालीन चांदा (चंद्रपूर)चे अपक्ष दिवंगत खासदार लाल श्याम शाह हे फक्त एकच दिवस सभागृहात गेले आणि राजीनामा दिला. कोण होते लाल श्याम शाह, त्यांनी राजीनामा कशासाठी दिला, त्याची तशीच प्रेरक कहाणी आहे. 

कोण होते लाल श्याम शाह?- १ मे १९१९ रोजी तत्कालीन मध्य प्रदेशात लाल श्याम शाह यांचा जन्म झाला. ते चांदा (चंद्रपूर) क्षेत्रातील पानाबरसचे जमीनदार व चौकी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. जानेवारी १९५६ला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. - शाह यांनी १९५७ मध्ये चांदा लोकसभा निवडणूक लढविली. परंतु, काँग्रेसचे ॲड. व्ही. एन. स्वामी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. - १९६२च्या निवडणुकीत ॲड. स्वामींचा पराभव करून ते  खासदार झाले. ५ सप्टेंबर १९६२ला त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली व एप्रिल १९६४ला त्यांनी राजीनामा दिला. - दिल्लीचे ज्येष्ठ संपादक व अभ्यासक सुदीप ठाकूर यांनी लिहिलेले लाल श्याम शाह यांचे हिंदी चरित्र २०१८ मध्ये प्रकाशित झाले आणि त्यांच्या राजीनाम्याचे ऐतिहासिक कारण अभ्यासकांसमोर आले.  

राजीनामा देण्याचे कारण काय?  लाल श्याम शाह हे जल, जंगल व जमिनीच्या लढाईचे शिलेदार होते. सीमांकन होऊन चांदा मतदारसंघ मध्य प्रदेशातून मुंबई राज्यात आला. १९६२ मध्ये ते चांद्यातून खासदार झाले. त्याचवेळी पूर्व पाकिस्तानातून बांगला निर्वासितांना दंडकारण्यात आणण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली.स्थानिक आदिवासींचे प्रश्न अत्यंत बिकट असताना केंद्र सरकार दंडकारण्यावर नवी आपत्ती का लादत आहे, असा लाल श्याम शाह यांचा सवाल होता. अखेर प्रचंड अस्वस्थ झालेल्या शाह यांनी लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष सरदार हुकूमसिंग यांनाचांदा येथील धर्मराव बंगल्यातून राजीनामा लिहिला. लोकसभा अध्यक्ष सरदार हुकूमसिंग यांनी २४ एप्रिल १९६४ला राजीनामा मंजूर केला. हा राजीनामा सुदीप ठाकूर लिखित चरित्रग्रंथात उपलब्ध आहे.  

राजीनाम्यात काय म्हटले?‘मी सरकारला कोणतीही गोष्ट करण्यासाठी भाग पाडू शकत नाही; पण या सगळ्या बाबींवर नव्या पद्धतीने विचार करण्याची विनंती करू शकतो. यासाठी माझा हा राजीनामा आहे.’

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४chandrapur-pcचंद्रपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४