Maharashtra Election Voting Live : दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील दहा मतदारसंघात 61.22 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 07:18 AM2019-04-18T07:18:25+5:302019-04-18T21:10:40+5:30

मुंबई - लोकशाहीच्या महापर्वातील दुसऱ्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज  मतदानाचा ...

Maharashtra Lok Sabha Election 2019 Live Voting News and Updates from marathwada in 10 constiutency | Maharashtra Election Voting Live : दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील दहा मतदारसंघात 61.22 टक्के मतदान

Maharashtra Election Voting Live : दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील दहा मतदारसंघात 61.22 टक्के मतदान

मुंबई - लोकशाहीच्या महापर्वातील दुसऱ्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 95 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली.  महाराष्ट्रात मराठवाड्यातील 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत असून, त्यात 15 कोटी 79 लाख 34 हजार मतदान आपला हक्क बजावतील. या 95 मतदारसंघांत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, फारुख अब्दुल्ला, खा. हेमा मालिनी, खा. कणिमोळी, राज बब्बर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, कार्ती चिदम्बरम, तारीक अन्वर यांच्यासह 1600 उमेदवार रिंगणात आहेत. 

महाराष्ट्रातील 10 मतदारसंघांपैकी बीडमध्ये प्रितम मुंडे-बजरंग सोनावणे, अमरावती मतदारसंघातून नवनीत कौर राणा- आनंदराव आडसुळ, सोलापुरात सुशीलकुमार शिंदे- प्रकाश आंबेडकर-जयसिद्धेश्वर शिवाचार्य, उस्मानाबादमध्ये राणा जगजितसिंह पाटील-ओमराजे निंबाळकर, नांदेडमध्ये अशोक चव्हाण-प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदरासंघात 1 कोटी 54 लाख मतदार गुरुवारी मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात सहा विद्यमान खासदार पुन्हा आपले भाग्य अजमावित आहेत. एकूण 167 उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी एक-दोन अपवाद वगळता इतर ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. महिला मतदारांची संख्या जवळपास पुरुषांच्या बरोबरीने असल्याने त्यांचे मत महत्त्वपूर्ण असेल. राज्यातील सर्वच ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पण, अनेक ठिकणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत बसावे लागले.

 

08:54 PM

दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील दहा मतदारसंघात 61.22 टक्के मतदान



 

06:32 PM

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील दहा मतदारसंघात 57.22 टक्के मतदान

संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मतदानाची मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे.
सोलापूर - 51.98 , नांदेड - 60.88, हिंगोली -60.69 , बीड - 58.44 , लातूर  - 57.94, उस्मानाबाद -57.04 , परभणी - 58.50 , अकोला -54.45 , बुलडाणा - 57.08 , अमरावती - 55.43 
 

06:01 PM

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57 टक्के मतदान

बुलढाणा - बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57 टक्के मतदान

05:46 PM

लातूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला

05:12 PM

लातूर मधील बसवंतपूर येथे विवाहानंतर नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

लातूर मधील बसवंतपूर येथे विवाहानंतर नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

04:06 PM

दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील दहा मतदारसंघात 46.63 टक्के मतदान

दुपारी तीन वाजेपर्यंतची मतदानाची मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे. सोलापूर - 41.47, नांदेड -50.04 , हिंगोली -45.97, बीड - 48.90, लातूर  - 48.10, उस्मानाबाद -46.13, परभणी - 48.45, अकोला - 45.39, बुलडाणा - 46, अमरावती - 46 

03:53 PM

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने परभणीत बजावला मतदानाचा हक्क

परभणी- मराठीतील आघाडीचा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने गुरुवारी परभणी येथे येऊन मतदानाचा हक्क बजावला. 
संकर्षण कऱ्हाडे हे परभणीचे मूळ रहिवासी असून, सध्या मुंबई येथे स्थायिक आहेत.

 

03:00 PM

माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पोलिसांच्या ताब्यात

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी आमदार राजन पाटील मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल

02:59 PM

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अनगर येथे मतदारांना पोलीसांकडून मारहाण, पाच जण जखमी, माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पोलीसांच्या ताब्यात.

02:47 PM

सोलापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील बार्शी शहरातील नगरपालिका शाळेतील मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यास हृदयविकाराचा झटका, पुढील उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल

02:46 PM

रिसोड विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर दुपारी १ वाजेपर्यंत ३५ . ७६ टकके मतदान

वाशिम : अकोला लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या रिसोड विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर दुपारी १ वाजेपर्यंत ३५ . ७६ टकके मतदान

01:18 PM

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क



 

01:06 PM

सोलापुरात 149 व्हीव्हीपॅट मशिन बदलले, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदान यंत्रात बिघाड, मतदानावर परिणाम,  १४९ व्हीव्हीपॅट मशीन बदलले, जिल्हा निवडणुक अधिकारी राजेंद्र भोसले यांची माहिती.

01:05 PM

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २१.४७  टक्के मतदान

लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा :
सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २१.४७  टक्के मतदान
 
मुंबई दि १८:  लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २१.४७ टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

दहा लोकसभा मतदारसंघात सकाळी ११.०० पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा २०.४९ टक्के, अकोला २१.०३ टक्के, अमरावती २०.०६ टक्के, हिंगोली २४.०८ टक्के, नांदेड २४.४० टक्के, परभणी २६.१७ टक्के, बीड १८.९४ टक्के, उस्मानाबाद,  २०.०९ टक्के, लातूर २३.१४ टक्के आणि सोलापूर  ‎१६.५० टक्के.
 

01:03 PM

सोलापुरात 400 ईव्हीएमची पर्यायी व्यवस्था, उशिरापर्यंत चालणार मतदान



 

12:49 PM

ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार

सोलापूर : मतदान यंत्रात बिघाड, मतदान करण्यास वेळ वाढवून द्यावा, काँग्रेस ला मतदान केल्यास भाजपला मतदान होत असल्याबाबत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

11:50 AM

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 21 % मतदान

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 21 % मतदान

11:38 AM

माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

11:05 AM

सायन मध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई, 11.85 लाख रुपये जप्त



 

10:53 AM

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी गौडगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. 

10:29 AM

बीड :  जिल्ह्यातील दोन गावाने टाकला मतदानावर बहिष्कार... बीड तालुक्यांतील कुंभारी...गावातील नागरिकांनी गाव पुनर्वसन आणि तळ्यात जमीन गेलेला मावेजा न मिळाल्याने...हा निर्णय घेतला आहे. तर बीड तालुक्यांतील सौंदाना गावाने स्वातंत्र्या पासून रस्ता झाला नाही..गावकऱ्यांनी भूमिका घेतलीय. या दोन्ही गावांना मतदानासाठी अधिकारी..प्रयत्नशील आहेत

09:57 AM

नांदेड : लोकसभा मतदारसंघ सकाळी 7 ते 9 या वेळेत झालेले मतदान 

पुरुष 71021
स्त्री 57288
एकुण 1283309

टक्केवारी 7.47

उस्मानाबाद : 9 वाजेपर्यंत 5.87 %

परभणी : लोकसभा मतदारसंघ 
सकाळी 7 ते 9 दोन तासांत 5.30 टक्के मतदान
पुरुष: 53930
महिला: 51217
एकूण: 105147

09:29 AM

महाराष्ट्रात 9 वाजेपर्यंत 0.85 टक्के मतदान



 

09:16 AM

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघात मतदान यंत्रात बिघाडचा घोळ कायम, बऱ्याच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा रांगा. शहरातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याबद्दल काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तक्रार

08:41 AM

मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह, गरोदर महिलेनंही पतीसह केलं मतदान



 

08:36 AM

मराठवाड्यात सोलापूर उस्मानाबादसह इतरही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन बंद

गुंजोटी ता. उमरगा गावातील बूथ क्रमांक 259 मधील EVM voting मशीन बंद ! मतदान रखडले !!  एकूण मतदान 694 .. 

अकोला: व्याळा बुध क्र 123 वर इ एम व्ही मशीन मध्ये प्रॉब्लेम 1 तास उशिरा सुरू झाले मतदान

भंडारकवठे गावात तसेच सोलापूर शहरात चाँद तारा मशीद परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याची तक्रार

परभणी : पालम तालुक्यात आरखेड येथे मशीन बिघाडामुळे एक तासा पासून मतदान बंद,अधिकाऱ्यांचे पथक दाखल.

08:07 AM

अकोला - हातरुन येथे नवरदेव योगेश नागळे याने लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला

08:06 AM

अकोला- अकोट येथील पोपटखेड मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मधे बिघाड मतदार 7 वा आले परंतु प्रक्रिया सुरु झाली नाही

अकोला- अकोट येथील पोपटखेड मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मधे बिघाड मतदार 7 वा आले परंतु प्रक्रिया सुरु झाली नाही

07:58 AM

सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड

अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे असलेल्या बूथ क्रमांक 274 मध्ये मतदान यंत्रात बिघाड. 

07:52 AM

हिंगोली : सखी मतदान केंद्रावर मतदारांसाठी रेड कार्पेट,औक्षण करून केले स्वागत.



 

07:51 AM

सर्वधर्मसमभाव व लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा : आमदार प्रणिती शिंदे

07:42 AM

ईव्हीएम खराब झाल्याने मतदानाला उशिरा सुरूवात

सोलापूर : बोरगाव ता अक्कलकोट येथे बूथ क्रमांक २ वरील मशीन दुसऱ्या गावी गेल्याने मतदानास उशीर , ४५ मिनिट झाले अजूनही मशीन आली नाही. मतदार ताटकळत थांबले आहेत. तर, अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे  एक तर आचेगांव येथील बूथ वर दोन EVM खराब झाल्याने मतदानास उशीर झाला आहे.

07:25 AM

काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क

सोलापूरमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली. शिंदे यांनी सोलापूर येथील जागृती विद्या मंदिर येथे जाऊन मतदान केले.  यावेळी त्यांच्यासोबत पत्नी उज्ज्वलाताई शिंदे, मुलगी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या.


07:27 AM

ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांनीही सकाळी लवकरच मतदान केलं

ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनीही सकाळी सकाळीच रांगेत उभे राहून सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2019 Live Voting News and Updates from marathwada in 10 constiutency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.