शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर यांना संधी, ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनीही दाखल केला उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 07:31 IST

Maharashtra legislative council election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे यांनी अर्ज भरला.

मुंबई : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी विधिमंडळात आपले उमेदवारी अर्ज सादर केले. तर ऐनवेळी भाजपच्या पाठिंब्याने सदाभाऊ खोत यांनीही अर्ज दाखल केले. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे यांनी अर्ज भरला. तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांचा एक अतिरिक्त अर्जही सादर करण्यात आला. याशिवाय, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज सादर केले. भाजपच्या जाहीर उमेदवारांपैकी उमा खापरे यांनी गुरुवारी आपला अर्ज सादर केला. तर भाजपसोबत असलेल्या रयत क्रांतीच्या सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून आपली दावेदारी सादर केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत होते. विधान परिषदेसाठी भाजपने पाच नावांची घोषणा केली आहे. तर, सदाभाऊ खोत यांना पाठिंबा देत मैदानात उतरवले आहे. त्यामुळे भाजपकडून एकूण सहा अर्ज सादर झाले आहेत. तर, शिवसेना आणि काँग्रेसकडून प्रत्येकी दोन- दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर, राष्ट्रवादीकडून अतिरिक्त उमेदवार शिवाजीराव गर्जे यांच्या अर्जासह एकूण तीन अर्ज आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवार रिंगणात आहेत. 

उमेदवारीचा निर्णय एकमताने - जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या नावांची घोषणा केली. शेवटच्या दिवशी नावे जाहीर झाल्याने या दोन्ही नावांमुळे पक्षात नाराजी असल्याचे वृत्त होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच ही उमेदवारी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या उमेदवारीबाबत पक्षात नाराजी असल्याचं वृत्त चुकीचे असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरVidhan Parishadविधान परिषद