शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

MLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 14:09 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत आतापर्यंत परभणी-हिंगोली, चंद्रपूर, अमरावती विधान परिषदेच्या जागांचा निकाल जाहीर झाला आहे. 

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांचे निकाल आज जाहीर झालेत. अमरावती आणि चंद्रपुरात भाजपानं बाजी मारली असून, नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तसेच कोकणातील जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपा 2, सेना 2, राष्ट्रवादी 1 जागांवर विजयी झाले आहेत. परभणी-हिंगोलीच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे. अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे 441 मतांनी विजयी झाले आहेत. चंद्रपुरात भाजपाचे रामदास आंबटकर 550 मतं मिळवून विजयी झाले असून, काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना 462  मतं मिळाली आहेत. तर नाशिकमध्येही शिवसेनेच्या नरेंद्र दराडे(400) यांनी विजय मिळवला असून, राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांना 231 मते मिळाली आहेत. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले आहेत, त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळेंचा दारुण पराभव केेला आहे. नारायण राणेंच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे विजयी झाले आहेत. 

  • विधानपरिषद निवडणूक 2018 संपूर्ण निकाल 

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थाशिवसेना - नरेंद्र दराडे (412 मतं)राष्ट्रवादी - शिवाजी सहाणे (219 मतं) शिवसेना 193 मतांनी विजयी

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थाराष्ट्रवादी - अनिकेत तटकरे (421 मतं)शिवसेना - राजीव साबळे (221 मतं)राष्ट्रवादी 200 मतांनी विजयी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थाशिवसेना - विप्लव बाजोरिया (256 मतं)काँग्रेस - सुरेश देशमुख (221 मतं) शिवसेना 35 मतांनी विजयी

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थाभाजपा - प्रविण पोटे-पाटील (458 मतं)काँग्रेस - अनिल मधोगरिया (17 मतं) भाजप 441 मतांनी विजयी

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थाभाजपा - रामदास आंबटकर (550 मतं)काँग्रेस - इंद्रकुमार सराफ (462 मतं)भाजप 88 मतांनी विजयी

टॅग्स :Electionनिवडणूक