शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' 5 क्षेत्रांमध्ये राज्याची पिछाडी; मात्र उद्धव सरकारच्या CMPमध्ये उल्लेख नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 13:47 IST

राज्यासमोर अनेक महत्त्वाच्या समस्या

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी महाराष्ट्र विकास आघाडीनं राज्याच्या विकासासाठी किमान समान कार्यक्रम जाहीर केला. शेती, रोजगार, आरोग्य, उद्योग, सामाजिक न्याय, शिक्षण आणि ग्रामविकासाला प्राधान्य देणार असल्याचं महाविकासआघाडीनं किमान समान कार्यक्रमातून स्पष्ट केलं. मात्र राज्याच्या पाच महत्त्वाच्या समस्यांचा यामध्ये उल्लेख नाही. 1. अनियंत्रित लोकसंख्या, बकाल शहरं- महाराष्ट्रात देशभरातून स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण अतिशय जास्त आहे. रोजगार, शिक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण मुंबईत येतात. उज्ज्वल भविष्यासाठी येणारी हजारो कुटुंब झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. मुंबई, ठाण्यात तर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी वास्तव्यास आहेत. राज्यातील कित्येक शहरं यामुळे बकाल झाली आहेत. लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 2. नैसर्गिक स्त्रोतांची कमतरता- राज्यात पाण्याची समस्या खूप मोठी आहे. गेल्या दशकभरात समस्येची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. 3. शहरीकरणामुळे वनांवर कुऱ्हाड- पश्चिम घाटाला जागतिक वारशाचा दर्जा आहे. मात्र शहरीकरणामुळे पश्चिम घाटातील अनेक भागांमध्ये झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. कोकणातही मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू आहे. या भागातील पर्यटन वाढत असलं तरी निसर्गाची हानी होत आहे. 4. वाढतं प्रदूषण- लोकसंख्या वाढत असल्यानं प्रदूषणाची समस्यादेखील उग्र स्वरुप धारण करत आहे. कचऱ्याची समस्या दिवसागणिक भीषण होत आहे. कचऱ्याच्या चुकलेल्या व्यवस्थापनामुळे अनेकदा मुंबई पाण्याखाली जाते. मुंबईच्या किनाऱ्यांवरदेखील अनेकदा कचऱ्याचे ढिग दिसतात. 5. छोट्या शहरांचा विकास- मुंबई, नाशिक, पुणे हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो. मात्र या राज्यांवरील भार कमी करण्यासाठी आणि भौगोलिक समतोल राखण्यासाठी नागपूर, सांगली, कोल्हापूर, अमरावती, सोलापूरसारख्या शहरांचा अधिक विकास करणं गरजेचं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना