शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
4
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
5
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
6
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
7
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
8
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
9
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
10
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
11
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
13
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
14
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
15
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
16
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
17
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
18
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
19
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
20
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या

महाराष्ट्र ‘मेफेड्रोन’ तस्करीचे केंद्र, तीन वर्षांत देशातील मेफेड्रोनच्या प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे राज्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 05:49 IST

‘Mephedrone’ Smuggling: महाराष्ट्र हे मेफेड्रोन तस्करीचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील मेफेड्रोनच्या एकूण प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे या राज्यात घडली आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - महाराष्ट्र हे मेफेड्रोन तस्करीचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील मेफेड्रोनच्या एकूण प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे या राज्यात घडली आहेत. गृह मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, सिंथेटिक ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात मेफेड्रोनची १,४८६ प्रकरणे नोंदली गेली. २०२२ मध्ये २९०, २०२३ मध्ये ६४७ आणि २०२४ मध्ये ५४९ प्रकरणे नोंदली गेली. त्याच कालावधीत २,२५० जणांना अटक करण्यात आली. राज्याच्या बंदरांमधून, महामार्गांवर आणि बेकायदेशीरपणे प्रयोगशाळांमधून याचा प्रवास होत आहे.

मुंबई आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ३,५०९ आणि २०२१ मध्ये ७,०८९ वरून २०२२ मध्ये ११,०४६ पर्यंत सायकोट्रॉपिक पदार्थांची प्रकरणे वाढली. त्यामुळे एक प्रमुख वितरण केंद्र म्हणून याकडे बघितले जाऊ लागले. 

गांजामध्ये राज्याचा वाटा कमी- मेफेड्रोन तस्करीत महाराष्ट्राचे वर्चस्व असले तरी गांजा प्रकरणांमध्ये राज्याचा वाटा कमी आहे. एकूण १.६४ लाख गांजा प्रकरणात २.४ लाख आरोपींना अटक करण्यात आली. यात राज्याचा वाटा सुमारे २-३% आहे. - महाराष्ट्रात गांजा प्रकरणांची एकूण संख्या ५०९१ आहे. ज्यामध्ये ६२८५ अटक आहेत. २०२२ मध्ये १,३५० आणि २०२३ मध्ये १,८४९ वरून २०२४ मध्ये १,८९२ पर्यंत प्रकरणे वाढली. ही ४० टक्के वाढ होती. -२०२२ मध्ये १,६७८ आणि २०२३ मध्ये २,२६१ जणांना अटक झाली. २०२४ मध्ये २,३४६ जणांना अटक झाली. केरळसारख्या इतर राज्यांमध्ये ८१,२४७ प्रकरणे समोर आली. उत्तर प्रदेशात १६,३४२ प्रकरणे आणि १८,९०४ जणांना अटक करण्यात आली.

देशात आढळली १,९०२ मेफेड्रोन प्रकरणे सुरक्षा दलांनी राज्यात कार्यरत असलेल्या या प्रकाराचा शोध घेण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. २०२२-२०२४ दरम्यान देशभरात एकूण १,९०२ मेफेड्रोन प्रकरणे आढळली. यात ३,०१२ जणांना अटक करण्यात आली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करीMaharashtraमहाराष्ट्र